दहीहंडी 2025-26
Автор: siddheshwar balmandir prathamik
Загружено: 2025-08-20
Просмотров: 369
श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधेची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती गीता चिकमनी मॅडम यांच्या हस्ते श्रीकृष्ण व दहीहंडी ची पूजा करण्यात आली. कृष्णाचा पाळणा व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या गायन शिक्षिका सौ. अनुजा देशपांडे मॅडम यांनी कृष्ण जन्म पाळणा गीत गायिला तसेच विद्यार्थ्यांना गोपाळकाला तयार करून दिला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुखा सौ. विजयालक्ष्मी आमाणे व सहशिक्षका सौ. अन्नपूर्णा सिडगिद्दी, सौ. अनुजा देशपांडे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
*घेतला वसा शिक्षणाचा,ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा*💐💐💐💐💐💐💐
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: