वन्यजीव सप्ताह २०२३ वन्यजीव माझ्या परिसरात स्पर्धा भाग - १ || Wildlife Week 2023 || About Nature
Автор: About Nature
Загружено: 2023-10-15
Просмотров: 362
वन्यजीव सप्ताह २०२३ वन्यजीव माझ्या परिसरात स्पर्धा भाग - १ || Wildlife Week 2023 || About Nature
नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल आणि अबाऊट नेचर यूट्यूब चॅनल तर्फे वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीव माझ्या परिसरात या स्पर्धेचे आयोजन केले होते.
वन्यजीव माझ्या परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना आपल्या परिसरात आढळणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण करून त्याविषयी माहिती मिळवण्याची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट होते.
या स्पर्धेत चांगल्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे परिक्षक निसर्ग अभ्यासक श्री. प्रदीप कुळकर्णी हे होते.
या स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.
विद्यार्थ्यांनी..
१) आपल्या परिसरातील कोणत्याही एका वन्यजीवाचे फोटो किंवा ३० सेकंदाचा व्हिडिओ काढायचा होता. उदा. मुंगी, फुलपाखरू, बेडूक, पाल, सरडा, खेकडा, पक्षी वगैरे कोणत्याही एकाचे..
२) वरील पैकी कोणत्याही एका वन्यजीवाची माहिती ज्याचे विद्यार्थ्यांनी फोटो किंवा व्हिडिओ काढला असेल त्याची माहिती कोणत्याची जाणकार व्यक्तीकडून किंवा गूगल वरून माहिती मिळवायची आणि ती पाठ करायची..
३) ती पाठ केलेली माहिती आडवा मोबाईल पकडून विद्यार्थ्यांची माहिती देताना मोबाईल मध्ये शुटिंग करायची ( जास्तीतजास्त २ मिनिटांपर्यंत)
४) विद्यार्थ्यांची शूटिंग केलेला व्हिडिओ आणि नंबर एक मध्ये सांगितल्या प्रमाणे त्या वन्यजीवाचा फोटो किंवा व्हिडिओ २ ऑक्टो. ते ८ ऑक्टो. २०२३ पर्यंत पाठवायचा होता.
५) मोबाईलचा वापर पालकांच्या परवानगीने करायचा होता.
६) सर्व वन्यजीवांना १९७२ च्या कायद्यानुसार संरक्षण दिले आहे. त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ काढताना तो वन्यजीव कोणत्याही प्रकारे हाताळायचा नाही. तसेच त्याला कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही.
विशेषत : साप, विंचू, गोम यासारख्या वन्यजीवांचे फोटो, शुटींग करताना जास्त काळजी घ्यावी. (अशी सूचना दिली होती)
ही स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य होती या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 1500, 1000 व 500 आणि प्रशास्तिपत्रक दिले. तसेच सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक दिले.
( प्रशस्तिपत्रक ऑनलाईन दिले )
नेचर फेन्ड सोसायटी (NFS) पनवेल ही संस्था
अशाप्रकारच्या स्पर्धा किंवा निसर्गातील विविध घटकांचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी उपक्रम राबवत असते.
निसर्ग संवर्धनाच्या या कामामध्ये आपणास सहभागी व्हायचे असेल तर आपण संस्थेला आर्थीक मदत करू शकता. संस्थेचे बँक डिटेल्स पुढील प्रमाणे आहेत.
name : NATURE FRIEND SOCIETY (NFS) PANVEL
a/c no. : 36153830735
Bank : State Bankof India,
Branch : Palaspe
IFSC : ISBN0016067
धन्यवाद.

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: