सह्याद्रीच्या कुशीत लपलेला थंड पाण्याचं कुंड | Tamini Ghat | Milkybar Waterfall In Summer |
Автор: Psycho Prashil
Загружено: 2025-05-09
Просмотров: 95382
ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडतो.सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात येथील टेकड्या कात टाकतात. रूक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. पुण्यापासून कोकणात उतरणार्या ताम्हणी घाटात ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथाऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव प्लस व्हॅली दिले गेले.
दरीत उतरण्यास सुरुवात केल्यावर ठिसूळ दगडांची मालिका लागते. उतरताना वाटेत दिसणार्या मोठया दगडांमुळे सांदण दरीची आठवण होते. उजवीकडे उंच कातळकडा ठेवत आपण पुढे मार्गक्रमण करतो. पट्टीच्या गिर्यारोहकांनी या कातळ कड्यावरही प्रस्तररोहणाचा सराव केलेला दिसून येतो. तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये आपण दरीत पोहोचतो. गर्द झाडीनी हा भाग नटलेला आहे. दगडांच्या कपाऱ्यांमधून वाहत आलेले पाणी बऱ्याच ठिकाणी आढळून येते. उन्हाळ्यातही या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असते.
#travel #explore #adventure #water #hiddengems #summer
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: