रस्ते विकासाचा मोठा टप्पा! अंभोरा येथे १ कोटी ५४ लाखांच्या रस्ते कामाचे आ.धस यांनी केले भूमिपूजन
Автор: Aaj Marathi
Загружено: 2025-11-17
Просмотров: 8068
रस्ते विकासाचा मोठा टप्पा! अंभोरा येथे १ कोटी ५४ लाखांच्या रस्ते कामाचे आ.धस यांनी केले भूमिपूजन l आज मराठी
#अंभोरा #रस्तेविकास #भूमिपूजन #साहेबरावदरेकर #सागरआमले #आष्टीतालुका #बीडजिल्हा #नांदूर #खरडगव्हाण #परोडीलोणी #खुंटेफळ #सुरेशधस #नवीनरस्ते #विकासकाम #आजमराठी
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आंबोरा परिसरात एकूण १ कोटी ५४ लाख रुपयांच्या रस्ते विकास कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला माजी आमदार साहेबराव दरेकर तसेच गावचे सरपंच सागर आमले उपस्थित होते. स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याचबरोबर आंबोरा, नांदूर, खरडगव्हाण, खरडगव्हाण फाटा ते परोडी, लोणी ते खुंटेफळ या मार्गांचा समावेश असलेल्या एकूण ६ कोटी ७४ लाख रुपयांच्या मोठ्या रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते पार पडले.
या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील वाहतूक सुविधा सुधारतील, गावांमधील संपर्क वाढेल आणि नागरिकांना ये-जा अधिक सुलभ होणार असल्याचे स्थानिकांनी नमूद केले. या विकास कामांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना मूर्त स्वरूप मिळत आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: