House Lifting Aurangabad call 9813041594
Автор: House Lifting Services
Загружено: 2022-06-02
Просмотров: 264
House Lifting: औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एका घरमालकाने चक्क जॅक लावून अख्खे घरच जमिनीपासून उखडून चार फूट वर उचचले. उताराचा भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी यायचे. त्यामुळे वैतागलेल्या घरमालकाने हाऊस लिफ्टिंगचा हा अनोखा प्रयोग करत घराची उंची वाढवली आहे. अशा प्रकारे जमिनीपासून संपूर्ण घर वर उचलण्याची ही औरंगाबादेतील किंबहुना मराठवाड्यातील पहिलीच घटना असल्याच बोलले जात आहे. यापूर्वी पुण्यात सुद्धा असाच प्रयोग करण्यात आला होता.
शहरातील सातारा भागात राहणारे आनंद कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कुलकर्णी यांनी 2011 मध्ये सत्कर्मनगरात दोन हजार चौरस फूट भूखंडावर आपल्या स्वप्नातील घर बांधले. कालांतराने आजूबाजूला आणखी घर बांधली गेली. त्यामुळे काही वर्षांनी गल्लीतून जाणारा रस्ता उंच झाला. घर खाली झाल्याने दरवर्षी घरामध्ये पावसाचं पाणी साठू लागलं. त्यामुळे या अडचणीतून बाहेर पडण्याचा कुलकर्णी मार्ग शोधत असताना त्यांना हाऊस लिफ्टिंगबाबत माहिती मिळाली. यावर बराच विचारकेल्यानंतर कुलकर्णी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले घर वर उचलण्याचा निर्णय घेतला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: