समोरच्याला लायकीत कसे ठेवायचे काही गोष्टी सांगितल्या आहे असे वागलात तर मान राहील motivational facts
Автор: maya's motivation fact's
Загружено: 2025-11-30
Просмотров: 1049
#marathimotivation #inspring #bestlines #viralvideo #anujajadhav #moralstories #status #motivationalquotes #motivationalvideo #motivationalspeech #motivation #inspritionalspeech #inspirationalquotes #suvichar #marathistatus #suvicharmarathi #bestmotivationalvideo #bestvideo
स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील
1. नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही.
2. तुम्ही तुमचं आयुष्य इतक स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल.. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिय्या करतो की आपणं स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरू जाते.
3. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत.
4. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं
नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व हे कमी करून घेऊ नका.
5. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत.
6.आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे.
7. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.
8. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल.
9. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते.
10. संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो.
11. जीवनामधील काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत तर नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाहीत.
12. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्या पासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेले आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात.
13. नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं पाहता नारळ पाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर माञ डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही.
14. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही.
15. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा.
16. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात. ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देत नाही.
17. प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत.
18. जीवनामध्ये साधे सरळ लोकं ही नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो.
19. माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो.
एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती.
20. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: