डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसंदर्भात पत्रकारांच्या डिबेट मध्ये सहभाग नोंदवला
Автор: Shashikant Shinde - शशिकांत शिंदे
Загружено: 2025-10-26
Просмотров: 110
सिस्टीमचा हा खऱ्या अर्थाने दोष आहे, ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याला वाटतं की माझ्यामागे कोणीतरी आहे आणि कोणीही काही करू शकत नाही, त्यावेळी अशा प्रकारचे धाडस वाढते, असे माझे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून या राज्यात पोलीस अधिकारी असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असतील यांच्याकडून जे काम करून घेतले जातं, ती एक तर त्यांची हतबलता असते किंवा नाईलाजाने भूमिका असते. त्यांना असे वाटते की आम्ही काही केले तर काही होऊ शकत नाही, ही त्यांच्या मनातील भीती निघून जाते. आज गृह खाते पूर्णपणे अडीच तीन वर्षाच्या कालावधीत लयाला गेले आहे.
ती मुलगी स्वतःच्या कर्तुत्वाने डॉक्टर झाल्यानंतर ग्रामीण भागात आरोग्य सेवा केली. चांगल्या प्रकारचे काम केले, मग ती आत्महत्या करते. आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोट येते, त्यावर अगदी तिने तक्रार केलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतला असता तर त्या मुलीचा जीव वाचला असता. पोलीस प्रशासनातील माणूस आहे म्हणून पाठीशी घालण्याचा प्रकार झाला.
एखादा गुन्हा दाखल करायचा असेल तर 323 असेल तर 307 करायचा सांगून तसे रिपोर्ट तयार केले जातात. या गोष्टीत पाहायला गेलं तर व्यवस्था पोखरली गेली आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. माझ्या घरी दोन वेळा पोलीस आले. एकदा पोलीस घर पाहणी करायला आले. एक पोलीस घराच्या गेटवर जाऊन भांडण करून गेला, काही कारण नसताना. भीती हा प्रश्न जो प्रशासनाचा धाक असतो ना तोच राहिला नसेल तर गुन्हेगार बाजूला राहतात आणि सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल केले जातात. ही घटना घडली, कशी घडली ? डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करेल, असा विश्वास झिरो अवर चर्चेदरम्यान दिला.
#LawAndOrder #Maharashtra #DoctorSuicide #Beed #Satara #ShashikantShinde
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: