अहिल्यानगर शहरात मेडीकल दुकान उचकटुन चोरी करणारे आरोपी, स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
Автор: MJ News 90
Загружено: 2025-12-05
Просмотров: 574
अहिल्यानगर शहरात मेडीकल दुकान उचकटुन चोरी करणारे आरोपी, स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 30/11/2025 रोजी रात्री 12/00 वा ते दिनांक 01/12/2025 रोजीचे पहाटे 05/50 वा. चे दरम्यान पाटील मेडीकल, प्रणव फार्मा व उत्कर्ष सुपर मार्केट या बंद दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाचे तरी सहाय्याने उघडुन दुकानात आत प्रवेश करुन दुकानातील रोख रक्कम चोरुन नेलेे आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्री ऋषिकेश रामदास गांगर्डे वय - 28 वर्षे रा. आठरे पाटील शाळेजवळ, सोनु कन्स्ट्रक्शन, तपोवन रोड, ता. जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1140/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), 331 (4), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.
नमुद सुचनेनुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनिल पवार, शाहीद शेख, फुरकान शेख, गणेश धोत्रे, दिपक घाटकर, राहुल डोके, भिमराज खर्से, सतिष भवर, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन सदर घटना ठिकणीचे आजुबाजुला असलेले सी. सी. टि. व्ही. फुटेज चेक करुन, व्यवसायीक कौशल्याचा वापर करुन आरोपीचे माहिती काढत असतांना पथकास सदरचा गुन्हा इसम नामे 1) अकबर लुकमान खान, 2) आर्यान पप्पु शेख दोघे रा. दौलावडगांव ता. आष्टी, जि. बीड अशांनी मिळुन केला असुन, ते गुन्हा करते वेळी वापरलेली मोटार सायकलवर शेंडी बायपास कडुन अहिल्यानगर शहरात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ पंचवटी हॉटेल समोर सापळा लावुन थांबले असतांना दोन इसम मोटार सायकलवर डी.एस.पी चौकाकडे येतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना पोलीसांची ओळख सांगुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांने त्यांचे नांव 1) आर्यन पप्पु शेख वय 19 वर्षे, 2) अकबर लुकमान खान वय - 33 वर्षे दोघे रा. डौला वडगाव ता. आष्टी, जि. बीड, असे असल्याचे सांगितले. पथकाने आरोपी नामे अकबर खान यास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता, अकबर खान याने सदरचा गुन्हा मी व वरील साथीदार अशांनी मिळुन केला असुन, चोरीचे पैसे आम्ही दोघांनी वाटुन घेतलेले आहे. त्यापैकी काही रक्कम आमचेकडुन खर्च झालेले आहेत, उर्वरीत रक्कम आमच्याकडे असल्याचे सांगितले. तेव्हा दोन पंचासमक्ष पंचानामा करुन 7,200/ रु रोख रक्कम (आरोपी नामे आर्यन पप्पु शेख यांचे कब्जातुन), 30,000/-रु कि.चा एक मोटार सायकल गुन्ह्यात वापरलेली, 6,650/-रु. रोख रक्कम (आरोपी नामे अकबर खान यांचे कबाजातुन), 10,000/-रु कि.ची एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण 53,850/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी नामे 1) आर्यन पप्पु शेख वय -19 वर्षे, 2) अकबर लुकमान खान यांचेविरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोरी, घरफोडी चोरीचे 7 गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 भिंगार कॅम्प जि. अहिल्यानगर 13/2024 भा.द.वि. क. 454,380
2 भिंगार कॅम्प जि. अहिल्यानगर 597/2024 भा.न्या. सं. क.331(3),506
3 भिंगार कॅम्प जि. अहिल्यानगर 784/2024 भा.न्या. सं. क.331(3),506
4 भिंगार कॅम्प जि. अहिल्यानगर 05/2025 भा.न्या. सं. क.331,506
5 भिंगार कॅम्प जि. अहिल्यानगर 60/2025 भा.न्या. सं. क. 334
6 तोफखाना जि. अहिल्यानगर 36/2025 भा.न्या. सं. क. 305(अ)
7 तोफखाना जि. अहिल्यानगर 42/2025 भा.न्या. सं. क. 331(4), 305
नमुद आरोपी व मुद्देमाल तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1140/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), 331 (4), प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. #mjnews90 #news #come #crime #people #police #ahmednagar #महाराष्ट्र #छत्रपतीशिवाजीमहाराज #अहमदनगर #अहिल्यानगर #नगर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: