सागरेश्वरमंदिर व रेडीचे श्रीगणपतीमंदिर
Автор: Kalyankar Kapil
Загружено: 2025-06-18
Просмотров: 104
Music : Dear Autumn
Musician : @iksonmusic
Music : As leaves fall
Musician : @iksonmusic
सागरेश्वर मंदिर, समुद्रकिनारा
सागरेश्वर हे मंदिर आणि समुद्रकिनारा हे महाराष्ट्रामधील, सिंधूदूर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील भगवान शिवशंकराचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे मंदिर सागरेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या पाठीमागे च समुद्र किनारा आहे. येथे दुरदुरवरून भक्तगण येतात. विशेषतः सोमवती आमावस्ये दिवशी येथे विशेष गर्दी असते . येथील समुद्र किनारा स्वच्छ व शांत आहे. येथील वाळू सफेद लकाकी असलेली आहे . समुद्राचे पाणी ही नितळ निळेशार आहे. मंदिराच्या जवळच एक प्राचीन संग्रहालय आहे . जे कोकण प्रांतातील संस्कृतीचे दर्शन घडवते .
रेडी गावचे श्री गणपती मंदिर
रेडी गावचे श्री गणपती मंदिर वेंगुर्ला पासून 30 किमी अंतरावर आहे. ज्या भागात हे मंदिर आहे त्या भागात लोखंडाच्या खाणी आहेत.१९७६ सालामध्ये रेवती बंदराजवळील एका खाणीत श्रींची मुर्ती सापडली. तसा दृष्टांतच एका ग्रामस्थाला झाला होता. उत्खननानंतर असे लक्षात आले की ही मुर्ती पांडवकालीन आहे . मूर्ती अंदाजे ६फूट उंच आणि ४फूट रुंद आहे. सहसा गणपतीच्या मुर्तीला चार हात असतात पण ही मूर्ती द्विभूज आहे. पुन्हा दोन महिन्यानंतर उत्खनन झाले त्यात उंदराची मुर्ती सुद्धा सापडली. अगदी अलिकडच्या काळात या मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: