Mahur Datta shikhar | दत्ताचे मंदिर | दत्तशिखर | Mahur |Savitas World
Автор: Savita's World
Загружено: 2025-01-04
Просмотров: 303
#savitasworld #mahurgad #mahurgaddarshan #shridattashikharmahur
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उनकेश्वर महादेव मंदीर व्हीडीओ लींक
• गरम पाण्याचे झरे असलेले शिव मंदिर | उनकेश्...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहूरगड हे शक्तीपीठ आहेच व येथे दत्त शिखर दत्ताचे जागृत स्थान देखील आहे. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की, एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी महासती अनसूयेची सत्व आणि ब्रह्मशक्तीची परिक्षा घेण्याचा विचार केला. जेव्हा अत्री ऋषी आश्रमातून निघून गेल्यावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे हे तिघे ऋषी वेष धारण करून महासती अनुसूयेकडे भिक्षा मागण्यासाठी आले. त्यांचे योग्य आदरातिथ्य करून महासती अनसूयेने त्यांना जेवण्यास आमंत्रण दिले. पण, ते त्रिमूर्ती एका स्वरात म्हणाले, ''हे साध्वी, आमचा नियम आहे की आपण आम्हांस नग्नावस्थेत जेवण वाढावे. तरच आम्ही जेवण ग्रहण करू". अशी मागणी ऐकताच अनसूया द्विधा मन:स्थितीत गेल्या. त्यांनी अत्री ऋषींना मनात आणलं. अत्री ऋषींना त्यांच्या तेजामुळे आणि दैवी सामर्थ्याने कळाले की, त्यांच्या समोर असलेली त्रिमूर्ती अन्य कोणी नसून ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्यांनी हसतमुखाने त्यांची मागणी मान्य केली. अनसूया जेवण आणण्यासाठी जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या तिघांनी बाळ रूप धारण केले. आपल्या समोर एवढी सुंदर आणि गोंडस बाळं बघून अनसूया मातेचे मन गहिवरून आले. त्यांनी त्या तिन्ही गोंडस बाळांना आपल्या हृदयाशी कवटाळून त्यांना स्तनपान करून झोपवले. अशा प्रकारे माता अनसूयेच्या विनंतीला मान देत त्यांच्या पुत्रांच्या रूपाने त्रिमूर्तींनी श्री दत्त अवतार घेतला.
हे क्षेत्र फार प्राचीन आहे. या दत्त शिखर तीर्थस्थानाला राज्यातूनच नव्हे तर तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविक दर्शनास येतात. इथे आल्यावर रेणुका मातेचे दर्शन घेतल्यावर दत्त शिखरला दर्शन घेऊन मनःशांती मिळते. हे स्थान जागृत असल्याचे म्हणतात. आपण ही एकदा या मंदीरास नक्की भेट दया
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: