चुकीतून शिकलेला धडा "ब्लॉग डिलीट, मन मोकळं आणि गोव्याचं डेस्टिनेशन — एक वेगळी जर्नी!" 🚛❤️"
Автор: Kokani gandhar
Загружено: 2025-12-03
Просмотров: 11015
आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात माझा धामणी पंपावर सुरू झालेला दिवस. सकाळी पावणेसातला उठलो आणि फ्रेश होऊन मी गोव्याच्या दिशेने रवाना झालो. वाटेत आम्ही कॉफीसाठी थांबलो पण कॉफी अगदीच खराब होती, त्यामुळे मूड थोडा बिघडला.
यानंतर आम्हाला लांजा येथे एका व्यक्तीला भेटायचं होतं. माझ्या एका जुन्या व्हिडिओमुळे त्यांना वाईट वाटलं होतं म्हणून पहिल्यांदा भेटताच मी त्यांची माफी मागितली. आम्ही शांतपणे बसून बोललो आणि विषय तसाच शांततेत मिटला.
त्या व्हिडिओमध्ये त्यांची प्रायव्हेट एक्सीडेंट झालेली गाडी होती म्हणून तो ब्लॉग मी डिलीट केला.
आज मी एक महत्त्वाचा धडा शिकलो — कुणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवायच्या नाहीत.
त्यांच्याशी बोलून आम्ही पुढे गोव्याच्या दिशेने निघालो. राजापूर पार करून खारेपाटीच्या आधी आम्ही एका ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबलो. तिथला नाश्ता, चहा आणि उसळपाव एकदम भन्नाट होता!
थोडा घसा दुखत होता त्यामुळे फार बोलू शकलो नाही पण जर्नी सुरू ठेवली आणि शेवटी दुपारी 2:30 ला वेरणा गोवा येथे पोहोचलो. तिथे माझा मालही उतरला.
---
🎥 आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला?
कमेंटमध्ये नक्की कळवा!
❤️ आवडला असल्यास चॅनलला Subscribe करा – "Kokani Gandhar"
🔔 नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा!
#KokaniGandhar
#TravelVlog
#GoaJourney
#KonkanDiary
#TruckVlog
#DriverLife
#GoaTrip
#VlogMarathi
#TravelMarathi
#KonkanVlogger
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: