द्रष्टे उद्योजक टाटा | Sunandan Lele
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2025-11-22
Просмотров: 1871
नवीन कारखान्याची उभारणी करताना पर्यावरणाचा विचार करा...भरपूर देशी झाडे लावा. नगर रचना करताना रस्ते मोठे बांधा. सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांना जागा ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुटबॉल आणि हॉकी खेळांसाठी दर्जेदार मोठी मैदाने निर्माण करा. महान दूरदर्शी उद्योजक सर जमशेदजी टाटा यांनी त्याकाळात बिहार राज्यात असलेल्या साकची शहराची निवड नवीन स्टील कारखान्याच्या उभारणीसाठी करताना जे स्वप्न १८८० साली बघितले ते आपला मुलगा दोराब याला पत्र लिहून सांगितले होते. सर जमशेदजी लवकर देवाघरी गेले तरी दोराब टाटा यांनी सगळ्या सूचना तंतोतंत पाळल्या. शहराच्या मध्यभागी टाटा स्टीलचा अतिभव्य कारखाना आहे आणि बाजूने सुंदर शहर वसवले गेले आहे.
कोलकाता कसोटी सामना लवकर संपला त्याचा फायदा घेऊन जमशेदपूरला गेलो. माझी बीएमसीसीची मैत्रीण दिपा आणि तिचा पती संजय वर्मा यांनी मला जमशेदपूर फिरवले. त्यातील जेआरडी टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बघून मी थक्क झालो. त्याचाच हा खास रिपोर्ट.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: