Eka Talyat Hoti Badake| एका तळ्यात होती बदके |
Автор: Vikas Pethkar
Загружено: 2025-04-12
Просмотров: 693
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक 2
कोणी न तयास घेई खेळावयास संगे 2
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला 2, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी2
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले2
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना2 चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक
#SaregamaMarathi
#LataMangeshkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: