आता वाजला रे ! डंका , घेऊ नको शंका , हे सुधरायला गाव सारे लोक लागले🎼🎤 राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
Автор: Gurukunj
Загружено: 2020-08-03
Просмотров: 2160
ATA WAJLA RE! DANKA, GHEU NKO SHANKA,
SUDHRAYLA GAW SARE LOK LAGLE
आता वाजला रे ! डंका , घेऊ नको शंका ,
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।धृ ।।
डोक्यावर टोपली , हातात फावडे ,
मुखात नामघोष , देवासि आवडे ।
हेचि साधन आता साधले ,
कोणी सडका करी , कोणी बांधी विहिरी ।।
हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।१ ।।
आपलेच गांव आता तीर्थाचे स्थान ,
गावासि सुधराया देताति दान ।
याहूनि पुण्य नाही चांगले ,
सारे झाडझुड करी , स्वच्छ राहती घरी ।।
हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।२ ।।
मोठे जघीनदार भूदान देती ,
संपत्तिदानाची ऐसीच रीति ।
भूमिहीन नाही राहिले ,
कष्टी लहान थोर , श्रम करुनि फार ।।
सुधरायला गाव सारे लोक लागले ।।३ ।।
गरिबाची झोपडी बघताची मोडली ,
सर्व तरुणांनी सुधारोनि जोडली ।
सौंदर्य सजवोनि आणले ,
दास तुकड्या म्हणे , हेचि गाती गाणे ।।
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।४ ।।
गुरुकुंज , दि . १२-०८-१९५४
Live recorded audio in the voice of Rashtrasant Shree Tukdoji Maharaj
ह्या उपक्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या आवाजातील भजने एकत्रित करून ते सर्व एकाच चॅनेल वर उपलब्ध कसे करुन देता येईल याचा प्रयत्न केला आहे
In this Project We will try to collect all the Bhajans sung by Rashtrasant Shree Tukdoji Maharaj and upload it here only at one site so that it becomes easily available to all...
#Rashtrasant_Tukdoji_Maharaj_Bhajans
#Gopal_Salodkar
#Kishor_Agade
#Rashtrasant_Tukdoji_Maharaj
#Punyatithi
#Tukdoji_Maharaj_Punyatithi
#Tukdoji_Maharaj
#Gramgeeta
#Gurukunj
#Anup_Jalota_Bhajan
#Anup_Jalota
#Bhajan
#Abhang
#Gadekar_Maharaj
#Kale_Maharaj
#Kirtan
#Marathi_Bhajan
#Hindi_Bhajan
#Gramgeeta
#Gopal_Salodkar
#Rashtrasant
#Tukdoji_Maharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: