जय जय राम कृष्ण हरी 🎹 गुरुवर्य - श्री राजाराम ( बाबल ) सुतार 💐 आणि मंडळी 🙏🏻
Автор: Rajaram T. Sutar Fan club
Загружено: 2025-12-27
Просмотров: 1779
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, भजन गायक श्री राजाराम सुतार (बाबल बुवा ) यांचे पखवाज चे शिक्षण सुप्रसिद्ध पखवाज वादक कै. राम मेस्त्री यांच्या कडे झाले त्या नन्तर मृदंगमनी ह भ प कै. बाबुराव साटम बुवा यांज कडे झाले. आणि शास्त्रीय संगीताचे धडे ग्वालियर घराण्या चे गायक कै. डॉ . रवींद्रनाथ एरंडे यांच्याकडे झाले. नंतर पुढील शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित डॉ.राम देशपांडे ह्यांच्या कडे झाले.
बाबल बुवा म्हणजे भजन क्षेत्रातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध आहेत च आणि संत वाङ्मय गाढा अभ्यास त्यांचा अविरत चालू आहे. तसेच अभंगात अभ्यासपूर्वक विविध रागांचे मिश्रण करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
त्यांनी संत वांड्मयातील ८०० हुन अधिक अभंग, गौळण इ. संगीतबद्ध केलेत. अनेक नोटशन्स, तराने अशा अनेक रचनाबध्द केल्या आहेत. प्रत्येक चाल त्यातील राग हे एखाद्या भजन रसिकासाठी पर्वणीच....।
ह्या चॅनेल वरील गुरुजींनी गायलेले जय जय राम, अभंग , गौळण स्वतः संगीतबद्ध केलेल्या चाली आहेत.
वरील सादरीकरण डिसेंबर २०२५ , कै. राम मेस्त्री यांच्या गावी त्यांच्या स्मारकाला भेट देऊन भजनांजली अर्पण केली.
#भजन #maharashtra #malvani #तुकाराममहाराज #संत #विठ्ठल#dabalbaribhajan #पंढरपूर#संत #ठुमरी #संतचोखामेळा#santnamdev
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: