कैलासगड, एक आडवाटेवरचा किल्ला जो बऱ्याच जणांना माहीत नाही | मुळशी | Kailasgad Fort | Monsoon Trek
Автор: Sachin Puri Vlogs
Загружено: 2022-09-17
Просмотров: 1511
लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर, तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने एक किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजेच धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफ़ॉर्मर आहे. तर उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे. या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर अशी पाटी लावलेली आहे. या टेकडीवर जाणार्या मळलेल्या पायवटेने आपण १५ मिनिटात टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. येथून मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा व्यवस्थित दिसतो. पुढे असलेली दुसरी टेकडी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली आहे. हि टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो.
टेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याच्या डोंगराचा सरळसोट कडा खाली उतरलेला आहे. त्यामुळे किल्ल्याचा डोंगराला वळसा घालून डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला पठार आहे. त्यावर एक भगवा झेंडा लावलेला आहे. या पठारावरून दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. पठाराच्या विरुध्द बाजूला एक छोट टेकाड आहे. त्यावर चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक खाली उतरणारी पायवाट दिसते. या अवधड वाटेने ५ मिनिटे उतरल्यावर आपण कातळात खोदलेल्या गुहा टाक्यापाशी पोहोचतो. या टाक्यात खांब खोदण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. पण दगड ठिसूळ लागल्याने काम अर्धवट सोडले असावे.
टाक पाहून परत पठारावर येऊन डावीकडच्या टेकाडावर चढून गेल्यावर उध्वस्त घरांचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजूला एक नवीनच दगडी बांधकाम केलेलं दिसते. त्याच्या आत कातळावर कोरलेल षिवलोंग आहे. इथे आपली गड प्रदक्षिणा संपते.
Follow me on
Instagram - / sachinpurivlogs
/ fort_adventure_official
Facebook - / sachinpurivlogs
Contact us: [email protected]
Do not forget: Like, Share and Subscribe.
Thank You For Watching.
Ignore Tags👇
#trekking #sahyadri #climbing #climber #adventure #adventures #adventuretime #trekkinglovers #trekvlog #viral #viralvideo #trekkingvlogs #gadkille #forts #fortsofindia #fortsinmaharashtra #maharashtra #maharashtra_desha #maharashtrian
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: