तिरुपति बालाजी 🙏💯💛 Tirupati Balaji Lest Go Part 1🤔
Автор: umesh bhoir
Загружено: 2023-12-02
Просмотров: 1149
मूर्ती
बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे.
इतिहास
तिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला (श्री + मलय) म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे.
मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर (तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान २००० वर्षे जुणे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथील पहिली वेदी बांधली. [तमिळ] संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळ व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरू होती.[२] प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानमचे विश्वस्त पाहतात.
तिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात.
तिरुपतीमधील मंदिरे
श्री पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुचानूर (अलमेलुमंगपुरम) तिरुपतिशहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे.असे म्हणतात की या मंदिराला दर्शनाशिवाय तिरुमलात् संपूर्ण मंदिराचे करावा लागतो.हे मंदिर भगवान वेंकटेश्वराच्या पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान वेंकटेश्वर, विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचे अंशअवतार मानला जातो .पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत.
#tirupati #tirumala #india #hyderabad #tirupatibalaji #andhrapradesh #tirupathi #tirumalahills #govinda #krishna #vijayawada #nellore #kerala #mumbai #photography #guntur #vizag #chennai #ttd #lordbalaji #tirupatidiaries #bangalore #kurnool #city #smart #vishnu #harekrishna #tirumalatirupati #tirumalatirupatidevasthanam #chittoor #balaji #temple #tirupatibalajitemple #kadapa #god #instagram #banglore #warangal #hinduism #hindu #radhekrishna #vrindavan #bhajan #telangana #travel #telugumemes #pune #kakinada #hanuman #badrinath #unitedtirupati #itsmytirupati #karnataka #shiva #lordvishnu #tamilnadu #lordvenkateshwara #vitthal #andrapradesh #saintrampalji
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: