राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre
Автор: MARATHI TADKA
Загружено: 2018-08-12
Просмотров: 11646679
आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सर्व पक्षांचे नेते इथे बसले आहेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचे काम होऊ शकते तर इतक्मया वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते. गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस : राज्यात आतापर्यंत जलसंधारणाचे काम न होण्यामागची दोष कोणाचा? नागरिकांना या साठी दोषी धरता येणार नाही. मात्र गावागावांतील गटतट, जातीपाती, आणि राजकीय पक्षांमुळे जलसंधारणासाठी चा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चा नारा ‘इतरांना अडवा आणि त्यांची जिरवा’ असा झाला. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरायला हवे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : http://marathitadka.com/
☛ Write us : [email protected]
☛ Whatsapp : 8100007744
Thank You!!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: