पावभाजी – सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी | Avishri Marathi receipe |
Автор: Avishri
Загружено: 2025-12-10
Просмотров: 28
साहित्य:
भाजीसाठी: (4 जणांसाठी)
बटाटे – 7 (उकडून कुस्करून)
फ्लॉवर – 2 कप (उकडून)
मटार – 1 कप (उकडून)
ढोबळी मिरची – 1 कप (उकडून)
गाजर--1/2 कप (उकडून)
बीट-1/4 कप (उकडून)
टोमॅटो – 4 (बारीक चिरून)
कांदा – 4 (बारीक चिरून)
आलं–लसूण पेस्ट – 2 टीस्पून
पावभाजी मसाला – 4 टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
हळद – ½ tsp
मीठ – चवीनुसार
लोणी (butter)– 2–3 टीस्पून
पाणी – गरजेनुसार
पावसाठी:
पाव – 4–6 (प्रत्येकी)
लोणी – 1-2 टीस्पून ( 100 ग्राम अमूल बटर पॅकेट )
⭐ कृती:
भाजी बनवणे:
कढईत लोणी गरम करा.
त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आलं–लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता.
मग टोमॅटो घालून मऊ होऊ द्या.
तिखट, हळद, पावभाजी मसाला व मीठ घालून मिसळा.
आता उकडलेल्या भाज्या (बटाटा, फ्लॉवर, मटार, ढोबळी मिरची , गाजर ,बीट ) घाला.
चांगले मॅश करा आणि पाणी घालून हव्या त्या घट्टपणाची भाजी तयार करा.
10–12 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
वरून थोडे लोणी आणि कोथिंबीर घालून भाजी तयार.
पाव गरम करणे:
तव्यावर लोणी गरम करा.
पाव मधून उघडा आणि तव्यावर ठेवा.
पाव दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत गरम करा..
🍽️ सर्व्हिंग:
गरमागरम भाजी उतरवून बटर-लावलेल्या पावांसोबत सर्व्ह करा. बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू बरोबर द्या.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: