माझा विशेष : ख्रिश्चनांच्या देशभक्तीवर संशय का?
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-07-06
Просмотров: 64693
भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राजीनामा देण्याच्या विचारात असल्याचं सांगितल्यानंतर, त्यांची मनधरणी करण्यासाठी आता भाजप नेत्यांनी शेट्टींच्या घरी रीघ लावलीय.
वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारं कुठलंही पद आपल्याला नको असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचं स्वत: शेट्टी यांनी बोलताना सांगितलं.
काल मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांचा स्वातंत्र्य लढ्यात कुठलाच सहभाग नसल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळे देशपातळीवर गोपाळ शेट्टी यांच्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी गोपाळ शेट्टींना झापल्याचं वृत्त आहे.
त्यानंतर शेट्टींनी पक्षानं आपल्यावर कारवाई कऱण्याऐवजी आपणच आपल्यावर कारवाई करु असं म्हटलंय. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीही आज शेट्टी यांची भेट घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: