Fr. Victor Anton Dalmet
Автор: God is great
Загружено: 2025-04-16
Просмотров: 2837
पवित्र मिस्साबलीची स्थापना, धर्मगुरूपदाची स्थापना व सेवेचा महामंत्र अशा आपल्या खिस्ती जीवनातील तीन महत्वाच्या घटना आज आपण साजरा करीत आहोत.
केंद्रबिंदू प्रभू येशूचे दुःखसहन, मरण व पुनरुत्थान आहे ते प्रत्येक मिस्साबलीत आज साजरे केले जाते. मिस्साबली ख्रिस्ती जीवनाचा उगम व उच्चांक आहे. एवाद्या धर्मगुरूंचे जीवन हे मिस्साबलीदानाभोवती केंद्रीत असते. ती भाकर उंचावताना तो प्रभूबरोबर आपले जीवन समर्पित करीत असतो व भाकर मोडताना लोकांच्या सेवेसाठी स्वतः मोडण्यास शक्ती मिळवत असतो. आपल्या सेवेसाठी प्रभूने केलेल्या प्राणार्पणाची ही स्मृती साजरी करीत असताना प्रत्येक भाविक सेवेद्वारे प्रेमाचे जीवन जगण्याचे अभिवचन देत असतो. हे माझ्या स्मरणार्थ करा ही प्रभूची आज्ञा मिस्साबलीद्वारे प्रत्येक क्षणाला संपूर्ण जगभर पाळली जात आहे. प्रत्येक धर्मगुरूने व भाविकाने ह्या प्रभूच्या बलिदानातून सामर्थ्य व शक्ती मिळवून सेवेसाठी स्वतःचे जीवन व्यतीत करावे म्हणून प्रार्थना करूया.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: