कोकणातील माझ्या शिहू गावचा शिमगोत्सव | आपले रायगड आपले महाराष्ट्र
Автор: Aple Raigad Aple Maharashtra
Загружено: 2025-03-21
Просмотров: 777
होळी शिमगा
होळी सण उत्तर व पश्चिम भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी हटके आहे. पाहूया कोकणातील शिमगोत्सव कसा साजरा केला जातो.
होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षं ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानल जातं. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो.
शिमगाचे वेगवेगळे खेळ
आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात 'जती'च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
BG Music credit:-
• Superhit Nonstop Holi Shimga Songs | Holi ...
you tube :- Sai mhatre
/ @saimhatre6549
#आपलेरायगडआपलेमहाराष्ट्र #शिमगा #होळी #कोकण #aagrikoli #आगरीकोळी #गाव
#सण #video #vlog #youtube #vlogger #kokan
#holi #holispecial #shimga #2025 #village
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: