शिरूर येथील चोरी गेलेले साडे सोळा तोळे सोन्याचे दागीने दिले फिर्यादी यांचे ताब्यात पोलिसांची कामगिरी
Автор: MJ News 90
Загружено: 2025-12-05
Просмотров: 243
चोरी गेलेले साडे सोळा तोळे सोन्याचे दागीने व दिड लाख रूपये रोख रक्कम असा एकुण १२ लाख ३६ हजार रूपयाचे मुद्देमालाचा शोध घेवून दिले फिर्यादी यांचे ताब्यात" शिरूर पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी
संपादक/वार्ताहर यांना सदर प्रेसनोटद्वावारे माहीती देण्यात येते की, शिरूर पोलीस स्टेशन येथे घरफोडी, जबरी चोरी, चोरी यांसारखे क्लिष्ठ गुन्हे दाखल होते. सदर गुन्हयातील आरोपीतांचा मा.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे सोो, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषन यांचे आधारे अज्ञात व सराईत आरोपीतांचा शोध घेवुन एकुन १८ गुन्हयांमधील चोरी गेलेल्या मालापैकी एकुण साडे सोळा तोळे सोन्याचे दागीने व दिड लाख रूपये रोख रक्कम असा एकुण १२,३६,५००/- रूपयाचे मुद्देमालाचा शोध घेवुन गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आला होता. सदरचा जप्त केलेला मुद्देमाल दिनांक २७/११/२०२५ ते आज दिनांक ०४/१२/२०२५ रोजी पर्यंत शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या १८ गुन्हयांचे फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिप गिल साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले सो मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापु मांगडे, महीला पोलीस अंमलदार अर्चना यादव यांचे पोलीस पथकाने केली आहे. #mjnews90 #news #come #crime #people #police #छत्रपतीशिवाजीमहाराज #महाराष्ट्र #पुणे #शिरूर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: