तीन शिरे सहा हात, गुरुवर्य श्री परमेश्वर बाबा जायभाये यांच्या सोबत श्रीदत्तजयंती निमित्त
Автор: Santosh Bargaje संतोष बारगजे
Загружено: 2025-12-03
Просмотров: 111
श्री दत्त जयंती निमित्त
तीन शिरे सहा हात ।
तया माझे दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढे श्र्वान ।
नित्य जान्हवीचे स्नान ॥ध्रु.॥
माथा शोभे जटाभार ।
अंगी विभूती सुंदर ॥२॥
शंख चक्र गदा हाती ।
पायी खडावा गर्जती ॥३॥
तुका म्हणे दिगंबर ।
तया माझा नमस्कार ॥४॥
२९ डिसेंबर २०२० रोजी आमच्या राहत्या घरी जामखेडला भजन करुन श्रीदत्तजयंती साजरी केली होती. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य ह.भ प. श्री परमेश्वर महाराज जायभाये. यांच्या सोबत भजन करण्याचे भाग्य मला लाभले.
बाबांनी शिकवलेले भजन मोडके तोडके म्हणता येते. जे येते ते बाबांचे आहे. जे चुकते ते माझ्या आहे. या अभंगात माझ्याकडून काही ठिकाणी टाळ वाजवण्यात, मागे सात-संगत करण्यात चुका झाल्या आहेत. परंतु हा अभंग व तो क्षण माझ्यासाठी फार मोलाचा. हा अभंग यूट्यूबला टाकावा अशी इच्छा झाली.
बाबांच्या चाली म्हणजे त्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. प्रत्यक्ष बाबा पुढे जातात त्यांच्या मागे माझ्यासारख्याला म्हणण्याचा योग येतो तो आनंद काही वेगळाच माझ्यासारख्या सामान्य माणसाला जमेल ना जमेल परंतु या भजनातून परमानंद मिळतो हे नक्कीच.
आज ४ डिसेंबर २०२५ या दिवशी दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
संतोष बारगजे, जामखेड जि. अहिल्यानगर
मुळगाव पिंपळनेर तालुका शिरूर कासार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: