दाभोळमध्ये शिमगा उत्सव उत्साहात ;रंगपंचमीने सांगता
Автор: KONKAN STAR
Загружено: 2023-03-13
Просмотров: 1526
दाभोळमध्ये शिमगा उत्सव उत्साहात ;रंगपंचमीने सांगता
दाभोळ - दाभोळ मध्ये शिमगा उत्सव अत्यंत शिस्तप्रिय आणि शांततेत पार पडला. फाग पंचमीला सुरू झालेला हा शिमगा अखेर याची रंगपंचमीने सांगता झाली.
दाभोळ शिमगा उत्सव सोहळ्याची रंगपंचमीने सांगता होताना दरवर्षीप्रमाणे संदेश तोडणकर हे पालखीची फुलांनी अफलातून सजावट करतात. ही सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे पालखीला एक वेगळेच असे रूप पाहावयास मिळते. प्रथम पालखी सजावटीसाठी आणि नंतर गावासाठी देवाला गा-हाणा घालण्यात आला आणि पालखी सहाणेवरून रंगपंचमी साठी उठविण्यात आली.
या उत्साहात चंद्रशेखर बगाडे यांनी चलचित्र आणून रंग भरला. ही सर्व चित्रे पाहण्यासाठी दाभोळ मध्ये आजूबाजूच्या गावातील मंडळी दाखल झाले होते. रंगपंचमी मध्ये तेही सहभागी झाले होते. तसेच दाभोळ मधील चाकरमानी ही दाखल झाले. आदी कारणास्तव रंगपंचमीला दाभोळ मध्ये तुफान गर्दी पहावयास मिळाली. रात्री अडीच वाजता पालखी देवळात शिरली आणि शिमगा उत्सवाची सांगता झाली..... दाभोळ ची रंगपंचमी पाहण्यासाठी फक्त कोकण स्टार न्यूज वर...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: