ड्रॅगन फ्रुट सीझन संपल्यानंतर बागेची मशागत करणे, बेड बनवणे यात वेळ व पैशांची बचत कशी करावी
Автор: KGF(AGRO) शेतीवाडी
Загружено: 2025-11-23
Просмотров: 700
ड्रॅगन फ्रुट सीझन संपल्यानंतर बागेची मशागत करणे, बेड बनवणे यात वेळ व पैशांची बचत कशी करावी|संपूर्ण माहिती
KGFAgro 9763434430
ड्रॅगन फ्रुट फळ बागेमध्ये फळांच्या सीजन संपल्यानंतर बागेची मशागत करणे गरजेचे असते. फळांच्या सीझनमध्ये पावसामुळे व त्या जमिनीमध्ये फळ तोडण्यासाठी सतत चालल्यामुळे जमीन अतिशय कडक बनते. त्याचबरोबर आपण सीझनच्या सुरुवातीला फळबागेला दिलेली खते बेडच्या खाली यायला सुरुवात होते व बेडची माती ही खाली वाहून येते. त्यामुळे बेडला माती लागणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बागेमध्ये खत व पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी बेडला योग्य पद्धतीने माती लागणे गरजेचे आहे. संपूर्ण पावसाळ्यामध्ये बागेमध्ये तन वाढलेले असते तेही स्वच्छ होणे गरजेचे आहे. तन व्यवस्थापन करणे ,मशागत करणे, तसेच बेड बनवणे या कामांमध्ये पावर टिलर चा वापर करणे अतिशय प्रभावी ठरत आहे व त्यामुळे आपल्या पैशांचीही बचत होत आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: