भारतातील अद्भुत असे एकमेव मंदिर. मंगळ ग्रह देवस्थान , अमळनेर ...
Автор: Bhraman with Maahi
Загружено: 2025-06-22
Просмотров: 767
आज आपण आहोत उत्तर महाराष्ट्रातील खान्देश प्रांतात असलेल्या एका ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात. ते म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहर. या शहराशी माझा परिचय आला तो साधारणतः ९ वर्षापूर्वी. त्याच कारण म्हणजे माझ्या सौ च हे माहेर. त्यामुळे दरवर्षी माझ येथे येणे होते. हे शहर अनेक कारणांनी पूर्वापार प्रसिद्ध आहे. त्यातील काही कारण म्हणजे, साने गुरुजी यांची हि कर्म भूमी मानली जाते. इथल्या प्रताप महाविध्यालयात आपल्या जीवनातील बरीचशी वर्षे अध्यापनाच काम त्यांनी केल. इथल्याच वसतिगृहाच्या एका खोलीत त्याचं वास्तव्य होते. आज ही ती खोली आपल्याला प्रताप महाविध्यालयात पाहायला मिळते. तसेच हा तालुका मुख्यत्वे करून शेती प्रधान आहे. इथे मुख्य करून कापूस, मुग, उडीद, हरभरा, तुर, तीळ, मका, ज्वारी, दादर, धणे अशी पिके घेतली जातात. इथेच अझीम प्रेमजी हे जगप्रसिद्ध अशा विप्रो कंपनी चे संस्थापक यांनी विप्रो कंपनी चे मोठे प्लांट उभारले आहे. तसेच इथे काही प्रसिद्ध अशी मंदिरे सुद्धा आहेत, त्यातील एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे मंगळ ग्रह देवस्थान. संपूर्ण भारत वर्षामध्ये मंगळ ग्रह देवाची फक्त २ देवस्थान आहेत. एक पश्चिम बंगालमधील कोलकाता मध्ये आणि दुसरे महाराष्ट्रातील अमळनेर शहरामध्ये स्थित आहे. त्यामध्ये पूर्णाकृती मूर्ती असलेले मंगळ ग्रहाचे हे एकमेव असे मंदिर आहे. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार माणसाच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा खूप प्रभाव असतो. त्यापैकी ज्योतीश शास्त्रामध्ये मंगळ आणि शनी ग्रह यांचा विशेष असा प्रभाव समजला जातो. म्हणून अमळनेर मधील मंगळ ग्रह मंदिराला ला विशेष महत्व प्राप्त आहे. या मंदिर भ्रमणामध्ये आपण मंदिराचे स्थापत्य, वैशिष्ठे, मंदिराचा इतिहास, मंगळ ग्रह देवाबद्दलच्या मान्यता, मंदिर प्रशासनामार्फत राबवले जाणारे उपक्रम, दोष निवारण्यासाठी केले जाणारे अभिषेक यांच्या बद्दल माहिती घेतली आहे.
तर मंगळ ग्रह देवस्थान येथे जाण्यासाठी अमळनेर साठी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, येथून आणि महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य शहरातून राज्य परिवहन मंडळाच्या बस तसेच खाजगी बसेस च्या सुविधा आहेत. मुंबई इंदोर राष्ट्रीय महामार्गावर धुळे या शहराजवळ साधारणता ५० किमी वर हे शहर वसलेले आहे. इथे तुम्ही ट्रेन ने जायचं असेल तर अमळनेर हे सुद्धा रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही दादर (मुंबई) वरून ट्रेन ने जाऊ शकता. किंवा जळगाव ला जाऊन जळगाव, भुसावळ वरून शटल ट्रेन ने जाऊ शकता. जवळचं विमानतळ हे जळगाव आहे. तर अशा या वैशिष्टपूर्ण मंदिराची सफर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडीओ साठी आपल्या भ्रमण विथ माही या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा. धन्यवाद..
माहिती स्त्रोत : मंगळ ग्रह देवस्थान जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी.
Instagram : https://www.instagram.com/bhraman_wit...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: