वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच शाही विवाह सोहळा संपन्न
Автор: Pandharpurch Nirbhid Mat
Загружено: 2026-01-23
Просмотров: 130
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न
विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
पंढरपूर (ता.23) आज 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला.
असा पार पडला विवाह सोहळा………।
सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री.रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री.विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री.विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला.
यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, डॉ. प्रणिता भालके, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.
यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन व विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: