Shirdi Ladies Sai Palkhi | अंधेरी ते शिर्डी महिलांची पायी पालखी | Ramnavami Palkhi | SP24 Taas
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2025-04-02
Просмотров: 5822
Shirdi Ladies Sai Palkhi | अंधेरी ते शिर्डी महिलांची पायी पालखी | Ramnavami Palkhi | SP24 Taas
राम नवमीच्या निमित्ताने साईनामाचा जयघोष करत देशभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यात विशेषतः मुंबईहून येणाऱ्या पालख्यांची संख्या जास्त असून हजारो साईभक्त पालख्यांद्वारे शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या पालख्यांमध्ये पुरुष भाविकांसह महिला भाविकांची संख्या उल्लेखनीय आहे.
मुंबई अंधेरी येथील साई प्रेरणा महिला मंडळाची पालखी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घाटात दाखल होताच साईबाबा संस्थानच्या वतीने या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या पायी पालखीत सहभागी होत पायी येणा-या महिलांचा सन्मान केला.
पंढरपूरला येणाऱ्या वारकरी दिंड्यांच्या धर्तीवर साई संस्थांनी यावर्षीपासून सुरू केलेला पायी पालखी स्वागताचा उपक्रम बघून साई भक्तांना देखील मोठा आनंद झाल्याचे बघायला मिळाले. भक्तांसोबत पायी चालत साई संस्थानचे अधिकारी देखील भजनात तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले.
#sp24taas #saipalkhi #shirdi #ramnavami #saisevak #saileela #shirdiupdate #ladkibahin #andheri #mumbai #mumbainews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: