माननीय विधिमंडळ पक्षनेते श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५ | नागपूर
Автор: Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Загружено: 2025-12-10
Просмотров: 30
माननीय विधिमंडळ पक्षनेते श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५ | नागपूर
महाराष्ट्र जन विश्वास (तरतुदींची सुधारणा) विधेयक, २०२५ आज विधानसभेत विचारात घेण्यात आला. त्यातील चर्चेत सहभाग घेऊन जयंतरावांनी त्या दृष्टीने आपले विचार मांडले.
महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदारांना त्रास देणारे लोक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. आपल्या राज्यात गुंतवणूक येत असताना त्याचे स्वागत करण्याऐवजी सर्वांनी त्याला कसं घेरायचं? याची तयारी केली जाते. माझंच सिमेंट घे, माझीच वाळू घे, माझेच ट्रक लाव, अशा धमक्या दिल्या जातात (ब्लॅकमेल) केलं जातं. आधीपासून जे उद्योग आहेत, त्याठिकाणीसुद्धा अशा घटना मोठ्या प्रमाणात सध्या घडताहेत.
गुंतवणूकदारांना त्याचा रेकॉर्ड तपासून सुरक्षा देण्याची व्यवस्था आपण करायला हवी. सहजासहजी कोण त्याच्या अंगावर जाणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी. मकोकाप्रमाणेच गुंतवणूकदारांनी तक्रार केली की, त्यांना थेट अटक करण्याचा विशेष कायदा आपण तयार करायला हवा. त्यासाठी एक कमिटी तयार करायला हवी. गुंतवणूकदारांना व्यवसायात कुठलीही अडचण येणार नाही आणि स्टॅम्प ड्युटीपासून कुणी सुटणार नाही, याचीसुद्धा त्या माध्यमातून आपण काळजी घ्यावी, अशा अनेक महत्वाच्या सूचना जयंतरावांनी शासनाला केल्या. असे केल्यास असा कायदा करणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरेल, असेदेखील त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. सोबतच, असे केल्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांची संख्या अधिक वाढेल असा विश्वासही व्यक्त केला.
#WinterSession2025 #WinterSession #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #jayantpatil
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: