शिमग्यात होळी मध्ये वाजवले दिंडे आणि आमट्या|आमट्या आणायला गेलो जंगलात,खाल्ली करवंद
Автор: KONKAN KATTA
Загружено: 2024-04-12
Просмотров: 527
शिमग्यात होळी मध्ये वाजवले दिंडे आणि आमट्या|आमट्या आणायला गेलो जंगलात,खाल्ली करवंद@konkan_katta_
#शिमगा #shimga #shimgastatus #konkanisong#konkani
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या कोकणातील होळीमध्ये वाजवले जाणारे पारंपारिक पद्धतीने दिंडे आणि आमट्या प्रामुख्याने पाहायला मिळतात.
प्रत्येक गावोगावी वेगवेगळी प्रथा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात.
माझ्या वणौशी गावामध्ये होळीमध्ये दिंड्या आणि आमट्या वाजवतो. या दिंडे आणि आमट्या आणण्यासाठी जंगलामध्ये जावे लागते. पण ही शिमग्यातील एक वेगळीच मज्जा असते. आमट्या आणण्यासाठी वाडीतील मुलं एकत्र येऊन सर्व जंगलात जातात . पण तुम्हाला एक सांगू का शिमग्यातील ही माझ्या आता राहिली नाही गावातील सर्व माणसं आता मुंबई ठिकाणी स्थलांतर झाले.
त्यामुळे गावाकडे कोणत्या राहिले नाही मोजकीच राहिलेली गावाकडची मंडली आहे त्यामध्ये होली साजरी करतात.
पण पहिल्यासारखी राहिलेली मज्जा आता पाहायला मिळत नाही पहिली होली लावण्यासाठी गावातील सर्व मुले गावातील होली वरती जमायचे. पण आता होली वरती जमण्यासाठी गावामध्ये कोण राहिलंच नाही.
दोन-तीन मुलं येऊन गावाची होली लावतात. जेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा आम्हाला आमट्या वाजवायला कौल पुरायचा नाही. आता कौल भरपूर असतो आणि पोरच कमी, मी दोन दिवसाच्या सुट्टीसाठी गावी गेलो होतो.
थोडी मजा करावी म्हणून मी माझ्या भावाला बोललो की आपण पण आज जाऊया आमट्या ना, जंगलामध्ये खूप फिरलो खूप ठिकाणी भटकलो पण पहिल्या सारख्या आमट्याच मिळाल्या नाहीत.
जंगलामध्ये फिरण्यासाठी आता वाटच शिल्लक राहिला नाही. पहिले गावाकडे गाईगुरे मोठ्या प्रमाणात पाळले जायचे पण आता त्यांची संख्या खूप कमी झाली त्यामुळे जंगलातील वाटा या कायमस्वरूपी बंद झाल्या.
जंगलामध्ये खूप फिरल्यानंतर आम्ही घराकडे निघालो 10-12 आमट्या मिळाल्या त्यामध्ये मी समाधानी होतो कारण खूप वर्षांनी गावी गेलेलो.
होळी वरच्या बालपणीच्या खुप आठवनी आहेत. त्या आठवलं की डोळ्यामध्ये पाणी येत .
आता फक्त गावाकडे राहिल्या त्या फक्त आठवणी.
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी......🙏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: