सासू सुनेची विहीर | मातंग विहीर रिद्धपूर | Riddhpur Sasu Sunechi Vihir and Matang Vihir
Автор: Explore with Dr. Jayant Wadatkar
Загружено: 2019-09-20
Просмотров: 185206
रिद्धपूरची सासू सुनेची पायऱ्यांची विहीर: वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना - डॉ. जयंत वडतकर
महानुभाव पंथाची काशी अशी ओळख असलेले रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील एक गाव, चांदूर बाजार या तालुक्याच्या ठीकानाहून अवघ्या 5 किमी अंतरावर वसलेले हे गाव श्री गोविंदप्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन असे स्थळ असून म्हईभट यांनी मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लीळाचरित्र सुमारे ८०० वर्षापूर्वी लिहिला तो रिद्धपुरात. श्री गोविन्द्प्रभू यांनी याठिकाणी सुमारे १२५ वर्षे वास्तव्य केले असे म्हटले जाते आणि या काळात त्यांनी अनेक लीळा केल्यात, त्यातील एक संदर्भ म्हणजे येथील सासू सुनेची विहीर.
आजपासून सुमारे साडे आठशे वर्षापूर्वी श्री गोविन्द्प्रभू यांनी सांगितलेल्या ठिकाणी रिद्धपुर येथील नागरिक केशव नायक यांनी ही विहीर खोदण्यास सुरुवात केली मात्र ती पूर्ण होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढील बांधकाम त्यांच्या मुलाने पूर्ण केले. वास्तुकलेचा उत्कृष्ट असा नमुना असलेली ही पायऱ्यांची विहीर कातीव काळ्या दगडात बांधलेली असून आहे. या विहीरत उतरण्यास उत्तर दक्षिण व पूर्व अशा तीन बाजूंनी वैशिठ्पूर्ण अशा अरुंद पायऱ्या आणि पश्चिमेला श्री प्रभू चरनाकीत मंदिर आहे. मंदिराच्या मागील भिंतीलगत मुख्य विहिरीत एक चौरस आकाराची वेगळी विहीर बांधलेली असून याबद्दल येथे एक आख्यायिका प्रचलित आहे. या विहिरीवरून जेव्हा सर्व गाव पाणी भारत असे मात्र या विहिरीचे मालक केशव नायक यांची पत्नी आपल्या सुनेस विहिरीवर पाणी भरू देत नसे. सुनेने ही तक्रार गोविन्द्प्रभूकडे केली, प्रभूंनी त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यामध्ये भिंत घालून एक चौरस अशी स्वतंत्र अशी विहीर सुनेस करून दिली. त्यावरूनच या विहिरीचे नाव पुढे सासू सुनेची विहीर असे प्रचलित झाले.
आम्ही गेलो तेव्हा या विहीरीची अवस्था गवत वाढल्याने, कचरा व गाळ साचल्याने बिकट झाली होती, मात्र अलीकडेच तिची स्वच्छता करण्यात आल्याने तिला पूर्वीचे स्वच्छ सुंदर रूप प्राप्त झाले आहे, पावसाळ्यात पाऊस भरपूर झाल्यास ती अशी तुडुंब भरते तेव्हा तिच्या सर्व पायऱ्या पाण्याखाली जाऊन तिचे सौंदर्य अधिकच बहरते.
रिद्धपूर गावाच्या बाहेर आणखी एक विहीर असून मातंग विहीर अशी तिची ओळख आहे. त्याकाळी गावातील शिवाशिव टाळण्यासाठी गावातील उच्चभ्रूनी दलितांना गावाबाहेर राहण्यास भाग पाडले, हा भाग संपूर्ण खडकाळ, त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे मातंग दलितांनी श्री गोविंद प्रभूंकडे आपली कैफियत मांडली तेव्हा प्रभूंनी त्यांना एका ठिकाणी पायाच्या अंगठ्याने जमीन उकरून तेथे विहीर खोदण्यास सांगितले, आणि आश्चर्य झाले, या खडकाळ भागात पाणी लागले. आज हे ठिकाण अमरावती नरखेड रेल्वे लाईन जेथून जाते त्या पलीकडे असून आजपासून सुमारे ८५० वर्षापूर्वी समाजाला मानवतेचा पाठ शिकवणाऱ्या घटनेचा साक्षीदार असलेली ही विहीर आज मानवतेचे स्मारक म्हणून सुद्धा परिचित आहे.
Camera & Gear used –
1) Video shoot with : Canon Power Shot SX50HS and GoPro Hero 7
2) Photographs - Canon Power Shot SX50HS and GoPro Hero 7
Music credits-
YouTube Library - https://www.youtube.com/audiolibrary/...
Category –History & Education
#Riddhpur#Sasu-SunechiVihir#ChandurBazar#Morshi#ShriGovindPrabhu#MahanubhavKashi#
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: