बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर कोकणवासीयांना न्याय देण्याची क्षमता ना.भरतशेठ यांच्यात आहे.मंत्री सामंत.
Автор: Tej Marathi news digital
Загружено: 2025-12-22
Просмотров: 2157
#bharatgogawale #udaysamant #tejmarathinews
बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर कोकणवासीयांना न्याय देण्याची क्षमता ना. भरतशेठ गोगावले यांच्यात आहे - उद्योग मंत्री उदय सामंत.
महाड नगरपालिकेतील ऐतिहासिक महाविजयाबद्दल शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व सर्व विजयी नगरसेवकांचे उद्योग मंत्री उदय जी सामंत यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी महाड नगरपालिकेच्या थकित नळपट्टीपैकी २७ कोटी रुपयांपैकी १७ कोटी रुपये माफ करण्यात येतील, असा महत्त्वपूर्ण शब्द देण्यात आला.
महाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच चवदार तळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उद्योग मंत्री ना. उदय सामंत, मंत्री ना. भरतशेठ गोगावले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व विजयी नगरसेवक यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
महाड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये ना. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २५ वर्षांनंतर महाड नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली आहे. या ऐतिहासिक महाविजयाबद्दल शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व सर्व विजयी नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. भरतशेठ गोगावले यांनी हा विजय महाडच्या मतदारांना समर्पित असल्याचे सांगितले. या यशासाठी शिवसेनेच्या प्रत्येक घटकाने, प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले असून हे यश त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, असे त्यांनी नमूद केले.
उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, त्यांचा पाठिंबा व साथ कायम शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे. “कुठल्याही प्रसंगाला घाबरणे हे शिवसेनेच्या रक्तात नाही. आपणहून कोणाच्या अंगावर जाणार नाही; पण कोणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करत, पराजित उमेदवारांनी खचून न जाता पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन केले. संपूर्ण महाराष्ट्रात युवकांमध्ये विकासकामांच्या बाबतीत ना. भरतशेठ गोगावले यांचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे त्यांनी सांगितले.
“भरतशेठ हे खऱ्या अर्थाने गरिबांचे शेठ आहेत आणि महाडकरांनी त्यांना स्वीकारले आहे, हे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
शिवसेना हे एक कुटुंब असून आमचे कुटुंबप्रमुख मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिकवण आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रसंगाला एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे मी कायम ना. भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारण हे समाजकारण करण्याचे माध्यम असून बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर कोकणवासीयांना न्याय देण्याची क्षमता ना. भरतशेठ गोगावले यांच्यात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमात उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी महाड नगरपालिकेच्या थकित नळपट्टीपैकी २७ कोटी रुपयांपैकी १७ कोटी रुपये माफ करण्यात येतील, असा महत्त्वपूर्ण शब्द दिला. तसेच उद्योग विभागाकडून महाड नगरपालिकेसाठी तसेच रायगड जिल्ह्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या ऐतिहासिक विजयानिमित्त महाडच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोदजी गोशाळकर, नितीनजी पालवे, विजय आप्पा खुळे. बाळासाहेब चांदोरे, राजाभाऊ रणपिसे, बंधू तरडे,नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर , नगरसेवक, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: