Kas Pathar Satara | कास पठार सातारा | Valley of Flowers | Kas Plateau | Seven Wonders of Maharashtra
Автор: भटकंती सह्याद्री समूह
Загружено: 2023-10-15
Просмотров: 489
कास पठार 🌻🏵️🌼💮🌺🍁🌸
***********
पश्चिम घाटातील कास पठार हे ठिकाण २०१२ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले. जवळपास १० चौ. किमी. अंतरावर पसरलेलं हे पठार ८५० प्रकारच्या फुलांचे माहेरघर आहे त्यातील ६२४ तर अति दुर्मिळ प्रकारातील फुल आहे.
साताऱ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. कास-भांबवली-तापोळा- महाबळेश्वर- पाटण हा परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात कोयनेचा शिवसागर जलाशय, भांबवली, वजरा३ धबधबा, अशी अनेक मनमोहक ठिकाण आहे या सदाहरित जंगलामध्ये पर्यटक अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेतात. कासचे पुष्प पठार, चाळकेवाडी पवनचक्कीचे पठार, पाचगणीचे टेबललॅड या पठारांना "सडा" असे संबोधितात.
कास पठार पाहण्यासाठी आपल्याला 150 रू प्रत्येकी शुल्क आहे ते आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुक करू शकतो मात्र एका दिवसात फक्त 3 हजार पर्यटकांना प्रवेश असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन तिकीट बुक करणे आवश्यक आहे.
इथे आढळणारी फुले आणि वनस्पतींच्या इतर प्रजाती खूप मौल्यवान आहेत. याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असेही म्हणतात. या पठारावर आणि कास सरोवरात अशी अनेक झाडे आहेत, जी इतरत्र कुठेही आढळत नाहीत.
कास पठारावर विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ, केरळ, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत.
कास पठार पाहताना आपल्याला gate नंबर 1 पासून सुरूवात करावी लागते त्यानंतर 2 3 4 अश्या पद्धतीने आपण पठारावरील फुलांचे सौंदर्य न्याहाळू शकतो.
कास पठार पाहण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ आहे.
___________________________________________
पोहचण्याचा मार्ग:-
१) सातारा - कास पठार २५ किमी
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
!!धन्यवाद!!
__________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
/ @bhraman_maharashtrache
#भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache
___________________________________________
Shoot by:-
DJI OSMO Action
--------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/82937...
इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
/ bhatkantisahyadrisamuh
/ nskharate
__________________________________________
Please Like Share and Subscribe Channel
Thank You 🙏
-------------------------------------------------------------------
#kaspathar #valleyofthewolves #satara #sevenwonders #maharashtratourism #कास #sahyadri #flowers #flower
*******************************************
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: