आकाश ठोसर सोबत अनुभवला जंगलाचा थरार🥵 |किल्ले कमळगड |घनदाट जंगलाने वेढलेला 😰| Kamalgad Fort | Satara
Автор: Psycho Prashil
Загружено: 2023-08-26
Просмотров: 783975
सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून बनवण्यात आला आहे ..
कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.
►YouTube - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho prashil
► Youtube - https://youtube.com/channel/UC6fOaVgA...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात.
महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन् किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.
१) महाबळेश्वरहून :-
महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदगणे गावी पोहचता येते. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत आपण कमळगडावर पोहचतो.
२) वाईहून :-
वाईहून नांदगणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.
३) इतर गावांतूनः-
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावी वाईहून एस.टी. बसने येता येते.
वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढण्यास सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासातच गडाच्या माचीजवळ येता येते.
वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले व निसर्गसौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊलवाटेने तसेच वर गेले की १५ - २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून कमळगड पूर्णपणे दृष्टिपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे.
राहण्याची सोय
गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात.
जेवणाची सोय
पाण्याची सोय : गडावर नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आhe.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
#kamalgad #celebrity #satara #trending #jungle #trekking #hiking #sairat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: