EP-01 | ज्योतिर्लिंग दर्शन | Way to Ujjain 🔱 | घृष्णेश्वर दर्शन | Day-1
Автор: Gaurav Patole
Загружено: 2025-12-10
Просмотров: 93
उज्जैन प्रवास : पहिला दिवस – घृष्णेश्वर दर्शन आणि पुढची वाट
उज्जैनच्या प्रवासाची सुरुवात आमच्यासाठी अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय ठरली. सकाळी लवकर आम्ही रस्त्याने प्रवास सुरू केला आणि पहिलाच थांबा होता घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. मंदिरात पोहोचताच परिसरातील शांत वातावरण, भक्तीभावाने भरलेली हवा आणि देवळातील नाद आम्हाला वेगळ्याच ऊर्जा देऊन गेला.
मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असताना मनात एक अनोखी शांती जाणवत होती. घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेताना जणू संपूर्ण प्रवासाची थकवा, काळजी सगळं कुठेतरी दूर गेलं. पवित्र जलाचा स्पर्श, घंटांचे निनाद आणि ओम नमः शिवायचे उच्चार – हे सगळं मनात कायमचं कोरलं गेल्यासारखं वाटलं.
दर्शन संपताच आम्ही पुन्हा रस्त्यावर निघालो. प्रवास पुढे सुरू झाला, खिडकीतून दिसणारी निसर्गाची दृश्यं, रस्त्यावरची मंद हवा आणि कधी हलकी गाणी… या सगळ्यामुळे प्रवास अधिकच आनंददायी झाला. मध्ये-मध्ये छोटे थांबे, चहा-नाश्त्याचे थांबे,आणि प्रवासातल्या गप्पा या सगळ्यांनी वातावरण आणखी रंगत आणलं.
पहिल्या दिवसाचा संपूर्ण अनुभव हा एकदम पवित्र, शांत आणि मनाला स्पर्श करून जाणारा होता. घृष्णेश्वरचे दर्शन हा प्रवासाचा सुंदर प्रारंभ ठरला आणि पुढचं उज्जैनचं साहस आणखी उत्सुकतेनं पुढे खेचत होतं. ते तुम्ही येणाऱ्या पुढच्या वीडियो (व्लॉग) मधे पहा .
आणि चैनल ला लाइक , कमेंट , शेयर , आणि सब्सक्राइब करायला विसरू नका.
🙏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: