Samvad Jalpurushashi / Vishwa Vikhyat Jaltadnya Dr. Madhavrao Chitale /Part-4/ Interview
Автор: AKASHVANI MUMBAI
Загружено: 2025-09-05
Просмотров: 81
“संवाद जलपुरुषाशी”
विश्व विख्यात जलतज्ज्ञ
डॉ. माधवराव चितळे
मुलाखत
भाग 4
‘प्रशासन, लोकसहभाग आणि जलनियोजन’
मुलाखतकार : विजय दिवाण
सादरकर्ते : शैलेश माळोदे
पाणी हा म्हटले तर प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला विषय. इतका की पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. या विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्या विषयाच्या अनुषंगाने अनेक मोठमोठी संशोधने आणि अभ्यास करण्यात आलेले आहेत-होत आहेत. जगभरातील जलस्रोत आणि जलसंपदेचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या विषयाला वाहून घेतलेले आणि आत्यंतिक तळमळीने सर्वसामान्यांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्कार्य करणारे विश्वविख्यात जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची मुलाखत आकाशवाणीने ध्वनिमुद्रित केली आहे. ही प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण अशी मुलाखत पत्रकार आणि लेखक विजय दिवाण यांनी घेतलेली आहे. यामध्ये डॉक्टर माधवराव चितळे यांचा संपूर्ण जीवनप्रवास आणि जलसंरक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य यासंबंधी सविस्तरपणे जाणून घेता येईल तसेच यासंदर्भातील जागरूकता अधिक प्रखर करण्याच्या दृष्टीने सुमारे पाच तासाहून अधिक अवधीची ही मुलाखत अत्यंत फलदायी ठरू शकेल, या हेतूने आकाशवाणीच्या पुरातत्व विभागातील ही मुलाखत लोकार्पित करण्यात येत आहे.
संकल्पना: शैलेश माळोदे
निर्मिती: आकाशवाणी मुंबई केंद्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: