गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. १०, नमस्ते नमस्ते प्रभो
Автор: Geet Dnyaneshwari
Загружено: 2025-01-21
Просмотров: 229
गुरुवर्य श्री किसनमहाराज साखरे यांना देवाज्ञा झाल्याचे वर्तमानपत्रातून कळले. साधारण ६-७ वर्षे (१९९४ ते २००२) मला त्यांचा सहवास आणि ज्ञानेश्वरी शिकण्याचे भाग्य लाभले. माझ्या हृदयात ज्ञानेश्वरीची दीपज्योत त्यांनी प्रज्वलित केली, ती आजही नंदादीपाप्रमाणे तेवत आहे! त्यांना मनःपूर्वक नमन करून श्रद्धांजली!
अध्याय ११
पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥
पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥
इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥
ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें ।
तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥
देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई ।
तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥
—————————————-
गीत ज्ञानेश्वरी : नादचित्रांची रुपडी
संकल्पना * संगीत * गायन
डॉ. दिनेश कात्रे, परितोष कात्रे आणि सौ. कीर्ती कात्रे
Contact: [email protected]
Copyright 2025 © All Rights Reserved
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: