Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

लसूण लागवड व्यवस्थापन|Garlic farming marathi|लहसून कि उन्नत खेती|लागवड ते काडणी संपुर्ण महिती|PSL AE

Автор: PSL AGRI EXPERT 24

Загружено: 2021-11-04

Просмотров: 96747

Описание:

लसूण लागवड व्यवस्थापन|Garlic farming marathi|लहसून कि उन्नत खेती|लागवड ते काडणी संपुर्ण महिती|PSL AGRI EXPERT,

लसुण लागवड व्यवस्थापण असे करा


लसूण सुधारित जाती

गोदावरी (सिलेक्‍शन-2),
श्‍वेता (सिलेक्‍शन-10),
फुले बसवंत,
ऍग्रिफाउंड व्हाइट (जी-41),
यमुना सफेद (जी-50)
जी-1 व
जी-323 इ. जाती मैदानी भागाकरिता उपयुक्त आहेत.

राज्यात प्रामुख्याने जांभळ्या लसणाला जास्त मागणी असते व बाजारभावही पांढऱ्या लसणापेक्षा चांगला मिळतो.

लसुण पाकळ्या निवड अशी करावी
लागवडीसाठी 1.5 ग्रॅम वजनाच्या पाकळ्या वापराव्यात.
पोचट किंवा पिवळसर रंगाच्या, लहान पाकळ्या वापरू नयेत.
त्यामुळे गड्डे उशिरा तयार होतात व उत्पादन घटते.
मागील हंगामात तयार झालेले व थंड आणि कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी वापरावेत.
हेक्‍टरी सहा क्विंटल बियाणे लागते.
लागवडीसाठी पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्य्राला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

लसणाच्या पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात 15 X 10 सेमी अंतरावर व 2 सेमी खोलीवर लावाव्यात.
साधारणपणे या अंतराने 60 झाडे प्रती चौ. मीटरला बसतात.
रूंदीशी समांतर वाफ्यात दर 15 सेमी अंतरावर पाकळ्या किंवा कुड्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकुन घ्याव्यात.
पाकळ्या उभ्या लावल्यामुळे उगवण एकसारखी होते.
सपाट वाफ्यात फार ढेकळे असतील तर हलके पाणी देऊन नंतर लागवड करावी. लागवडीसाठी मजुरीचा खर्च बराच येतो.
लागवड खर्चात कपात करण्यासाठी गुजरातमधील शेतकरी पाकळ्यांची पेरणी करतात. पेरणीमध्ये 2 ओळीत अंतर राखता येते परंतु 2 झाडातील अंतर कायम राखता येत नाही.
2 किंवा त्यापेक्षा अधीक पाकळ्या जवळ पडल्या तर गड्डे चपटे होतात.
शिवाय पाकळ्या आडव्या किंवा उलट्या पण पडतात.
त्यामुळे उगवण एकसारखी होत नाही.
अलिकडे हाताने ओढता येणारे लसुण लागवडीचे यंत्र लुधीयाना कृषि विद्यापीठाने विकसीत केले आहे.
या यंत्रामुळे लागवड खर्चात बरीच कपात होते व ओळी आणि झाडे यातील अंतर सारखे राखता येते.
ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच चालवुन वाफ्यात पाणी द्यावे व नंतर वाफस्यावर पाकळ्यांची टोकणी करावी.

लसूण पाकळ्या वर करावयाची कार्बोसल्फानची प्रक्रिया
लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बोसल्फानच्या द्रावणात 2 तास बुडवुन मग लागवड करावी.
10 लीटर पाण्यात 20 मीली कार्बोसल्फान मिसळुन द्रावण तयार करावे.

लसुण पूर्वमशागत, रानबांधणी व लागवड
खोलवर नांगरट करून लव्हाळ्याच्या गाठी व हरळीच्या काशा वेचून नष्ट कराव्यात व दोन-तीन कुळवाच्या पळा घालाव्यात.
शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
लागवड सपाट वाफ्यावरच करावी, त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार 4 2 किंवा 3 2 मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करावेत.
जमिनीला उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
जमीन सपाट असल्यास दीड ते दोन मीटर रुंद व 10 ते 12 मीटर लांब सरी वाफे तयार करावे.
दोन ओळींतील अंतर 15 सें.मी. व दोन पाकळ्यांतील अंतर दहा सें.मी. (15 10 सें.मी.) ठेवून दोन ते तीन सें.मी. खोलीवर टोकन पद्धतीने पाकळ्या उभ्या लावून कोरड्या मातीने झाकाव्यात. उभ्या पाकळ्या लावल्याने एकसारखी उगवण होते.
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बोसल्फान 20 मि.लि. व कार्बेन्डाझि 15 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याच्या द्रावणात दोन तास बुडवून नंतर लागवड करावी.

हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ ला लाईक शेअर आणि सबसक्राईब करा.

🔴Plz My channel PSL AGRI EXPERT like share and subscribe ...🔴

🔴HAPPY DIWALI 🔴

FROM - PSL AGRI EXPERT.

लसूण लागवड व्यवस्थापन|Garlic farming marathi|लहसून कि उन्नत खेती|लागवड ते काडणी संपुर्ण महिती|PSL AE

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]