जय भैरी जय भैरी | Jay Bhairi | Bhairi Buva Song | Mandar Shinde | Bhairavi Jadhav | Sunil Jadhav
Автор: Mandar_Shinde_876
Загружено: 2023-02-27
Просмотров: 53742
ग्रामप्रदक्षिणा निघाली ,ढोल ताशाच्या गजरी
एकच नाद घुमे आवाज, जय भैरी, जय भैरी ||ध्रुव||
बारावाड्याचा मानकरी,आहे सुवर्ण कांती झळाळी.
गळाभेटीला धावत येती, बहिणी नवलाई -पावणाई .
भक्तांच्या पाठीशी आहे ,तुझी क्रुपेची सावली .
डोळे भरूनी वाट पाहे,आई जोगेश्वरी माऊली. ||१||जय भैरी
राजाची निघाली सवारी,सडा रांगोळी दारोदारी .
स्वागतास आतुरली,तुझी लेकरे ही सारी .
दुःख संकटे सारी,तुझ्या चरणावर वाहीली .
विनवुनी हात जोडता,दैन्य सारी ति संपली. ||२||जय भैरी
तुच मायबाप माझा,आहे तुच पाठिराखा.
दोन अक्षरात समावला, असे भैरी देव माझा.
देवा अपुर्व तुझी थोरवी,गात असे स्वर भैरवी.
चुक भुल जरी झाली,गोड मानुन घे अंतरी . ||३||जय भैरी
-*****
गायिका..भैरवी सुनिल जाधव.
गीतकार..मंदार प्रमोद शिंदे 9423290094
संगीतकार..सुनिल काशिनाथ जाधव. (बुवा)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: