Ranthambore Safari: बंद पडलेली गाडी आणि पळून गेलेला गाईड, रणथंबोर पार्कमध्ये पर्यटकांसोबत काय घडलं?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-08-19
Просмотров: 417453
#BolBhidu #RanthamboreSafari #Rajasthan
रणथंबोर नॅशनल पार्कचा झोन नंबर ६. सफारीला आलेल्या पर्यटकांनी आणि ऐटदार चाल असणाऱ्या वाघांनी गजबजलेला. याच झोन नंबर ६ मध्ये शनिवारी १६ ऑगस्टच्या संध्याकाळी सफारीसाठी एक कँटर गाडी आली. झोन ६ मधल्या जंगलाच्या मधोमध ही गाडी पोहोचली तेव्हा हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. पुढच्या काही मिनिटात अंधार पडला आणि एक वेगळाच थरार सुरु झाला. मिट्ट अंधारात उजेड पडत होता तो मोबाईलच्या टॉर्चचा, अर्थात हा उजेड पुरेसा नव्हता. गाडीत जवळपास २० जण होते, पुरुष होते स्त्रिया होत्या, महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं होती.
या सगळ्यात घुमत होता, तो भेदरलेल्या लहान मुलांचा रडण्याचा आवाज, त्यांना गाडीतल्या मोठ्या माणसांकडून दिलासा दिला जात होता, पण तो सुद्धा पुरेसा नव्हता, कारण आजूबाजूला असणाऱ्या जंगलात होते जवळपास ६० वाघ, कित्येक बिबटे, जंगली अस्वलं आणि अगदी मगरीही. वाघांना बघण्याच्या उत्सुकतेची जागा आता भीतीनं घेतली होती आणि सफारीच्या आनंदाची जागा थरारानं. हे सगळं घडलं होतं, बंदपडलेल्या गाडीमुळे आणि ऐन जंगलात पर्यटकांना एकटं सोडून गेलेल्या गाईडमुळे. पण घडलं काय ? त्या २० पर्यटकांना कसला अनुभव आला ? ९० मिनिटांचा थरार होता कसा ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: