नागपूर विद्यापीठ चा 4 ऑगस्ट ला वर्धापण दिन.. डाँ माधवी खोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती......
Автор: मारेगाव ब्रेकिंग न्यूज
Загружено: 2025-08-03
Просмотров: 73
:
पत्रकार बंधु आणि भगिनींनो,
४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली, त्यावेळेस ६ महाविद्यालय, ९१७ विद्यार्थी आणि ४ विद्याशाखा हे आरंभीचे चित्र होते. या १०२ वर्षाच्या कालखंडात विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती केली आहे. दरम्यान ४ मे २००५ पासून नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. सद्यःस्थितीत विद्यापीठाचे ४७ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तर पाचशेच्या वर संलग्नित महाविद्यालय असून यामधून सुमारे ४ लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. मध्य भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वात जुने नावलौकिक असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०२ वा वर्धापन दिन समारंभ अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि विशेष अतिथी म्हणून मा. ना. डॉ. पंकजजी भोयर, राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) भूषविणार असून कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
:
आदर्श संस्था-अधिकारी-कर्मचारी पुरस्कार
-: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार
श्री. दत्ता राघोबाजी मेघे
-: आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सी.पी. अँड बेरार महाल, नागपूर
-: सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार वर्ष २०२१-२२ चा अॅड. मनमोहन वाजपेयी,
२०२२-२३ चा डॉ.
अजित रविकांत जाचक
२०२३-२४ चा श्री.
विष्णू वसंत चांगदे
-: बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक - श्रीमती सारिका विनोद गायकवाड (लेखा विभाग)
-: आदर्श अधिकारी पुरस्कार (विद्यापीठ) श्री उमेश मधुकर उईके
-: आदर्श शिक्षक कर्मचारी पुरस्कार वर्ग ३
(विद्यापीठ) - श्री दिनेश रामाजी दखणे व
श्री कैलास सिताराम बगमारे (लेखा विभाग)
-: आदर्श शिक्षक कर्मचारी वर्ग ४ (विद्यापीठ) - श्री. देवीदयाल कुंजबिहारी बापेयी
-: आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (संलग्नित महाविद्यालय) वर्ग ३ - श्री. राजेश काशीराम धुर्वे
आदर्श विद्यार्थी पुरस्कार
-: आदर्श विद्यार्थी पुरस्कार - चि. मोहित सरकार (हिस्लॉप महाविद्यालय, नागपूर)
-: आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार - कु. पृथ्वी
अनिलकुमार राऊत (शासकीय विज्ञान संस्था नागपूर)
-: उत्कृष्ट सांस्कृतिकपटू (विद्यार्थिनी) कु. कामाक्षी
:
हम्पीहोळी (हिस्लॉप महाविद्यालय, नागपूर)
-: उत्कृष्ट एनसीसी कॅडेट - कु. काजल एस.
क्षीरसागर (जी.एस. वाणिज्य महाविद्यालय, नागपूर)
-: उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक - चि. गोकुळ जाधव (वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर)
व कु. समीक्षा महादेव पोकळे (निकालस महिला महाविद्यालय, नागपूर) इत्यादी पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.
विद्यार्थी विकास योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी यावर्षी विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यापीठाने मोबाईल अॅप तयार केले आहे. विद्यार्थी विकास विभाग आणि रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या विविध योजना मोबाईल अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे. मोबाईल अॅपवर विद्यार्थी विकास विभागाच्या विविध योजना तसेच इंटर्नशिप, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठ संकेतस्थळावरील लिंक वर कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती, प्रशिक्षणाच्या संधी तसेच इंटर्नशिप करिता उपलब्ध असलेल्या जागा याविषयी थेट माहिती अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कार्पोरेट कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळावे याकरिता विविध स्वरूपाची माहिती थेट अपलोड करता येणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच कार्पोरेट कंपन्यांना देखील या मोबाईल अॅपच्या माध्यमातून मोठा लाभ मिळणार आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून आरटीएमएनयू स्टुडन्ट डेव्हलपमेंट
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: