साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी
Автор: मराठी समाचार न्यूज 24
Загружено: 2025-08-21
Просмотров: 663
साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा...
काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामहिम राष्ट्रपतीमहोदया , महामहिम राज्यपाल महोदय ,माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांना माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांचे मार्फत निवेदन देऊन साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली . साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खुप मोठा साहित्याचा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे . त्या साहित्याच्या माध्यमातून आणि गायन व शाहिरी पोवाडाच्या माध्यमातून स्वतंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांच्या जुलमी कारभाराबाबत व जुलमी कायद्याबाबत जनतेमध्ये जागृती केली व लोकांना स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले त्यांचे साहित्य परिवर्तनवादी व चळवळीला प्रोत्साहन देणारे आहे अण्णाभाऊंचे साहित्य आणि आणि त्यांचे स्वतंत्रसंग्रामात मोलाचे योगदान राहिले आहे.
तसेच मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे महत्वाचे योगदान राहिले आहे अण्णाभाऊंचे साहित्य 35 कादंबऱ्या 12 लघुपट आणि शेकडो गाणे, शाहिरी पोवाडे इत्यादी .त्यांच्या फकीरा या कादंबरीवर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे आणि फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अण्णा भाऊंचे साहित्य त्यांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळी तील योगदान त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्न च्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णाभाऊंना साठे यांना "भारतरत्न "पुरस्कार द्यावा अशी या निवेदनाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मागणी ककेली आहे या याप्रसंगी अविनाश भाऊ उमरकर संयोजक आर जी पी आर एस एडवोकेट भालेराव तालुका अध्यक्ष काँग्रेस जळगाव अयाज भाई एडवोकेट आर एस काकडे अमर पाचपोर योगेश बोदडे जुनेद शेख दिनेश काटकर वामनराव कोळेकर सतीश तिरेराव सुनील सोनवणे रवींद्र गोधळे भानुदास जाधव चंदनशिव सुरेश वानखडे श्रीकृष्ण तायडे विनोद ठाकरे प्रल्हाद लोखंडे अनिल इंगळे सुनील गव्हांदे आरिफ खान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: