AMC Election | नगरमध्ये विखे-जगतापांची त्सुनामी... तुतारीला भोपळाही फोडता आला नाही...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-01-16
Просмотров: 47749
विधानसभा, त्यानंतर नगरपालिका व आता महानगर पालिका निवडणुकीत भाजपने हॅट्रीक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा सर्वसमान्यांचा विश्वास तिसऱ्यांदा स्पष्ट दिसला," हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं एका वाक्यातलं उत्तर बरंच काही सांगून जातं. दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर, आज अहिल्यानगर महानगर पालिकेला नवे कारभारी मिळाले. गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. माजी खा. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप, या जोडगोळीने पुन्हा एकदा कमाल केल्याचं दुपारपर्यंत स्पष्ट झालं. दुपारी 12 वाजेच्या सुमारास, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रासमोर दोन डंपर भरुन गुलाल आणला. दुपारी एक वाजेनंतर मंत्री विखेंच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ही निवडणूक विखे- लंके या दोन नेत्यांभोवतील सुरुवातीपासून फिरवली गेली. परंतु निकालानंतर विखेंनी लंकेंना चारीमुंड्या चित केल्याचे दिसले. शरद पवार गटाच्या एकाही नगरसेवकाला खा. लंकेंना निवडून आणता आले नाही. खा. लंके यांचं, आमच्या बाह्या वरच आहेत... हे विधान नगरकरांना भावलं नाही.
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: