Shepu Fala | शेपूचे फळं
Автор: Pratibha Gujar
Загружено: 2025-08-13
Просмотров: 7363
@Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज मी शेपूचे फळं रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
ज्वारीचे पीठ -३ वाटी
मीठ - 1चमचा
शेपूची भाजी - १ मोठी पेंडी(पाव किलो)
तेल - २ १/२पळी
लसूण - १२-१५ पाकळी
लाल मिरची पावडर -१ चमचा
हळद -१/२चमचा
विधी =
ज्वारीचे पीठ १/२ चमचा मीठ घालून ते सैलसर भिजवावे.शेपूची भाजी निवडून ते २,३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व बारीक चिरून घ्या .मळलेल्या पिठाचे लहान लहान गोळे करून ते बोटांच्या साहाय्याने दाबून असे फळं तयार करा.व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे.कढईत तेल तापल्यावर त्यात लसूण ठेचून घाला व ते लाल झाल्यावर त्यात लाल मिरची पावडर, हळद घालून ते परतावे.वरील दिलेल्या प्रमाणात लगेच शेपूची भाजी घालून परतावे.भाजी थोडी पगळल्यावर १/२ चमचा मीठ घालून ते परतावे.१/२ ग्लास पाणी घालून भाजी ला उकळी
आल्यावर त्यात केलेले फळं घालून ते परत परतावे व बारीक गॅसवर झाकून २ मी.दमून घ्या.
आपले शेपूचे फळं खाण्यासाठी तयार आहेत.
धन्यवाद 🙏🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: