सुवर्णकन्या साक्षी बनसोडे थेट शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त
Автор: prmod Rout
Загружено: 2025-08-15
Просмотров: 1450
यशोगाथा – सुवर्णकन्या कुमारी साक्षी हरिदास बनसोडे
औंध शिक्षण मंडळाचे ब्रीदवाक्य "शील, शरीर आणि अध्ययन" अंगीकारून, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असतानाही कुमारी साक्षी हरिदास बनसोडे हिने क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली साक्षी लहानपणापासून श्रवणदोषाने ग्रस्त होती, पण पालकांच्या अथक प्रयत्न, उपचार व प्रोत्साहनामुळे तिने खेळाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली.
शालेय जीवनात 800 मी. धावणे, कुस्ती आणि जुडोमध्ये सहभाग घेत तिने जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांत पदके जिंकली. नंतर औंध शिक्षण मंडळाच्या राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर तिने जुडोमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
प्रमुख यशः
ब्राझील (2022) – ऑलंपिक डे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले पदक.
तुर्कस्तान (2024) – जागतिक चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक पहिले पदक.
मलेशिया (2024) – वैयक्तिक सुवर्ण व सांघिक कांस्य पदक.
राज्य, राष्ट्रीय व शालेय स्पर्धांत अनेक सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके.
तिच्या या उत्कृष्ट क्रीडाभारारीसाठी महाराष्ट्र शासनाने तिला "श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार" जाहीर करून सन्मानित केले. औंध शिक्षण मंडळाच्या इतिहासातील हा सन्मान मिळवणारी ती पहिली दिव्यांग सुवर्णकन्या ठरली.
साक्षीची कहाणी सिद्ध करते – "अडथळे मनात असतात, मार्ग कृतीतून सापडतो."
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: