तुम्ही कधी शिखर शिंगणापूर चा महादेव पाहिलाय का? Mahadev Mandir Shikhar Shingnapur
Автор: Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor
Загружено: 2025-01-19
Просмотров: 10500
#shingnapur #shivatemple #mahadev #harharmahadev #shikharshingnapur
नमस्कार मंडळी आजच्या भटकंतीमध्ये आपण निघालो आहोत, सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण - शिखर शिंगणापूर येथे.
फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे सह्याद्रीचाच एक फाटा असलेला शंभू महादेवाचा डोंगर. महादेवाचे प्रसिद्ध मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर.
या डोंगराच्या पायथ्याशी आहे शिखर शिंगणापूर गाव. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे, असे म्हणतात. समोर आपल्याला दगडी तटबंदीच्या मध्ये वसलेले पुरातन महादेवाचे मंदिर पाहायला मिळते.मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते.
मंदिराच्या आवारात आल्यावर समोर पाहायला मिळते आकाश स्पर्धा करणारा महादेव मंदिराचा सुंदर कळस. मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. पुढे झूम केल्यानंतर शिखरावरती साकारलेल्या विविध देवतांच्या आखीव रेखीव, सुबक मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्ती पाहून आपल्याला भारतीय स्थापत्य कलेविषयी अभिमान न वाटला तर नवलच.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावड आपल्या सासवड गावातून भुतोजी तेली यांची असते. कावडी द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहोचतात. दुपारनंतर अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चडतात.तर मंडळी याच आठवड्यात येणाऱ्या शिंगणापूरच्या यात्रेचा, मुंगी घाटातून डोंगर चढण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यायला विसरू नका.
Join this channel to get access to perks:
/ @manmokali_bhatkanti
#मनमोकळी_भटकंती #shingnapur #shivatemple #mahadev #harharmahadev #shikharshingnapur #shivtemple #mahadev #mahakal #shiv #harharmahadev #shivshankar #shiva #omnamahshivaya #bholebaba #shivshakti #bholenath #bhole #shivji #bambambhole #shivay #baba #sambhu #sankara #rudra #bholanath #mahadevtatto #ujjainkeraja #tattoo #kedarnath #ganesh #gujarati #rudraksh #sankarmahadeva #devokadevmahadev #shivshiv #parvti #temple #gujaratipost #maharashtra #m #lordshiva #har #shivling #mahakaal #ke #shivbhakt #india #somnath #om #bhfyp #jaybhole #somnathtemple #shivparvati #yatra #bhola #ahmedabad #shankara #surat #newreel #baroda #shravanmas #bhaibandh #bholekifouj #shivmandir #surti #bholenath #bhole #shivji #bambambhole #shivay #baba #sambhu #sankara #rudra #bholanath #mahadevtatto #ujjainkeraja #tattoo #kedarnath #ganesh #gujarati #rudraksh #sankarmahadeva #devokadevmahadev #shivshiv
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: