आबांच्या वाढदिवसाची संपूर्ण कविता / स्वरचित नवीन/९१ पूर्तीचा आगळा सोहळा/ 𝐕𝐌𝐢'𝐬 खाद्ययात्रा
Автор: VMi's Khadyayatra Marathi
Загружено: 2024-08-23
Просмотров: 620
साहित्यिक कृ. वि. दातार यांच्यावर ची संपूर्ण कविता
#poem
#marathikavita
#sohala
#food
#motivational
#marathi
गौर कांती खुटखुटीत देहयष्टी
चेहेऱ्यावर आगळंच तेज आणि समाधानी वृत्ती |
कथा कविता नाटक लेख हाताळले कितीतरी प्रकार
माणसाला पारखणारे, माणुसकी जपणारे हे आहेत कृ वि दातार |
चाकोरीत राहूनही यांची प्रतिभा मात्र मुक्त होती
साहित्याबरोबरच संगीतावर सुद्धा भक्ती होती |
कित्येकांना दिशा दाखवली मदतीचा पुढे केला हात
स्वतःवरच्या अनेक संकटांवर जिद्दीने केली मात |
सर्व हिशोब चोख सांभाळले नोकरी व्यवसायात
व्यवहार कधीच पाहिला नाही नातेसंबंधात |
गाडी, बंगला, कपडे यांची कधीच नव्हती आसक्ती
जोडलेला प्रत्येक माणूस, कमावलेलं नाव हीच यांची संपत्ती |
आता ९१ चे झाले सगळ्यांचेच लाडके आबा
काही होतंय का? असं विचारताच म्हणतात मी ठणठणीत आहे रे बाबा |
मला काहीही होत नाही हीच यांची tag line
म्हणूनच तर आजही ते आहेत fit and fine |
स्वयंपाक घरात खुडबुड करतात तेव्हा आवाज येतो अहो काय हवंय तुम्हाला?
झोप गं तू काहीही नकोय मला असं म्हणत परत लागतात डबे उघडायला |
स्वतःची कामं स्वतःच करायला याना आवडतात
कधी लाडू वळतात तर कधी डाळिंब्या सोलतात |
अशी थोडीफार आईंनाही मदत करतात |
औषधं वेळच्यावेळी घेण्याचा कधीच कंटाळा नसतो
कपडे काखोटीला मारून अंघोळीला पहिला नंबर असतो
आता भले कितीही नोकझोक झाली आईबाबांची
तरी त्यांना जाणीव आहे आईंच्या कर्तृत्वाची |
सध्या मिलिंद वाचतोय त्यांचं साहित्य आणि ते भक्तिभावाने ऐकतात
प्रत्येक कथेमागच्या आठवणींनी भावुक होतात |
परत एकदा त्यांच्या साहित्यविश्वात, जुन्या दिवसात हरवतात
बहुतेक त्यांच्यातल्या दुरावलेल्या साहित्यकाला नव्याने भेटतात |
आबा तुमची सकारात्मकता तुम्हाला यापुढे सुद्धा तारेल
आयुष्याच्या वाटचालीत श्रद्धा आणि सत्कर्माची साथ लाभेल |
यातनांचे डोळे उघडे असले तरी सोसण्याचे बळ मिळेल
तुम्हाला शतक पूर्तीचा वर देताना परमेश्वर ही आनंदेल ||
________________end____________________
नमस्कार मंडळी आजचा हा विडिओ खाद्याशी थेट संबंधित नसला तरी वमीस च्या कुटुंबातील सोहोळ्याचा एक भाग आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या वाढदिवसाचा विडिओ तुम्ही पाहिलात त्याला खूप प्रतिसाद दिलात त्यावेळी मी त्यांच्यावर कविता लिहिली होती ती संपूर्ण कविता आम्हाला ऐकायला आवडेल अशा वोटमेंट्स मला आल्या त्यामुळे मग हि कविता पण पोस्ट करावी म्हणून ह्या विडिओ चा प्रपंच केलाय बाकी आमच्या रेसिपीच चे विडिओ तर येत राहतीलच आणि हो मी पहिल्यांदाच केलेल्या फाफड्याचा विडिओ सुद्धा येणारच आहे बरं
माझे सासरे म्हणजेच कृ वि दातार हे रेसेर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला होते त्यांची एक साहित्यिक म्हणून सुद्धा खास ओळख करून दिली पाहिजे त्यांनी त्या काळी अनेक कविता, कथा नाटक दीर्घकथा ललीत लेख कादंबऱ्या असं सगळ्या प्रकारचं लेखन केलं विशेष म्हणजे त्यांचं जवळ जवळ सगळं साहित्य वर्तमानपत्र मासिक यात छापून आलं आहे
त्यांची तीन गाणी ध्वनिमुद्रित झाली १ म्हणजे तेजाचा पसारा हे गाणं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलंय आणि रामदास कामत यांनी गायलंय हे गाणं अजूनही आकाशवाणीवर प्रसारित होतं
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: