अळूच्या पानांची वडी l Alu vadi 😋😋l Marathi recipe l एकदा करून बघा l👍👌
Автор: Vijaya kabugade
Загружено: 2025-12-11
Просмотров: 156
अळूच्या पानांची वडी
साहित्य
10 ते 12 अळूची पाने
२ ते ३ वाटी बेसन पीठ
15 ते 16 लसूण पाकळ्या
४ कमी तिखट हिरव्या मिरच्या
२ चमचे कांदा लसूण मसाला
२ ते ३ चमचे सफेद तीळ
१ छोटा तुकडा खोबऱ्याचा
१ चमचा हळद
थोडासा गूळ आणि चिंच आवडीनुसार
एक-दीड चमचा मीठ आवडीनुसार
कोथिंबीर आवडीनुसार
कृती-
प्रथम आळूचे पानांचे पाठीमागचे देट चाकूने काढून घेणे शिरा काढल्यानंतर अळूची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे . गुळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवणे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर खोबऱ्याचे काप जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे पाणी टाकू नये. पातेल्यामध्ये किंवा एखाद्या वाडग्यात वाटलेलं वाटण पूर्णपणे काढून घेणे . त्यामध्ये मोठ्या दोन ते तीन वाट्या जेवढे बेसन पीठ बसेल तेवढे घेणे. पिठामध्ये गुळ चिंचेचे पाणी मिक्स करुन घ्या. त्यामध्ये १ चमचा मीठ घालून घ्यायचे. चटणी,हळद, कोथिंबीर पांढरे तील मिक्स करुन लागेल तसे पाणी टाकून पीठ सैलसर मळून घेणे. पानाच्या मागील बाजूला पीठ थोडे थोडे लावून रोल बनवून घ्या.गॅस वरती कढई ठेवून त्या मध्ये पाणी ओतून सुरुवातीला १५ मिनिटे व नंतर बारीक गॅस वरती ७ मिनिटे वाफेवर वाडीचे रोल उकडून घ्य.
#marathi Recipe #shortsviral #cooking #ytshortsvideo #yt #मराठी # वडी रोल #
आळूची पाने# # बेसन पीठ# आळूची वडी#
vijaya kabugade
मराठी रेसिपी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: