चामर लेणी | नाशिक | Chamar Leni | Nashik |
Автор: Jay adventures
Загружено: 2025-11-19
Просмотров: 267
ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. नाशिकला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकीच एक ‘चामर लेणी’ जैन बांधवांचे नाशिक मधील प्रसिद्ध धार्मिक तीर्थ क्षेत्र आहे. शेकडो जैन बांधव या तीर्थस्थानी भेट देण्यासाठी येत असतात. History Of Famous chamar caves in Nashik मात्र, या चामरलेणीचा नेमका इतिहास काय आहे ? चला तर पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून … चामर लेणी हे जैन बांधवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चामर लेणी दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली म्हणूनच या लेणीला ‘चामर लेणी’ असे म्हटले जाते. अनेक जन त्याचा उच्चार चांभारलेणी असा करतात. मात्र, तो उच्चार चुकीचा आहे. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनिराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याचे जैन बांधव सांगतात. म्हणून या ठिकाणाला गजपंथ म्हणून देखील ओळखंल जाते. ही लेणी साधारण 400 फूट उंचीवर आहे.वाचा : ‘भेटला विठ्ठल’ बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक!लेणीवर पाहण्याची ठिकाणे लेणी पर्यंत जाण्यासाठी 450 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला इंद्र आणि अंबिका देवीच्या मूर्ती प्रथम दर्शनी पडतात. इथे तीन गुफा आणि एक मंदिर आहे. राष्ट्रकुटांच्या काळात राजा वीरप्प देव यानी जैन दीक्षा घेतली आणि तो आचार्य वीरसे नावाने प्रसिद्ध झाला. त्याने नाशिकमध्ये सामान्य विज्ञान केंद्र स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. जैन धर्माच्या नऊ बलभद्रांपैकी सात बलभद्र हे गजपंथ सिद्ध क्षेत्रातून निरनिराळ्या तीर्थकारांच्या काळात मोक्षास गेल्याची आख्यायिका आहे. चामर लेणीतील पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवान यांच्या 3 मूर्ती आहेत. भगवान महावीर स्वामी, गुहेच्या बाहेर मिलात चंद्रप्रभू आणि आदिनाथ यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. दुसऱ्या गुहेत शांतिनाथ, कुंतुनात आणि अरहनाथ यांच्यासह अनेक सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत 11 फूट उंचीची भगवान पार्श्वनाथ यांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. लेणीतून बाहेर पडल्यावर या डोंगराला प्रदक्षिणा ही मारता येते. वाचा : ‘लोकांना हे आवडलं नाही, राज्यात वेगळं चित्र पाहण्यास मिळेल, शरद पवारांचं भाकित जैन बांधव काय सांगतात “नाशिकमध्ये गजपंथ हे पावन तीर्थक्षेत्र आहे. या गजपंथ तीर्थक्षेत्राला ‘चामर लेणी’ असे म्हटले जाते. या तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर प्रथमतः सात बलभद्रांच दर्शन होते. ते सात ही बलभद्र पावन झालेले आहेत. इथून ते मोक्षाला गेले आहेत. दोन गुफा आहेत. दुसर मंदिर पार्श्वनाथ भगवानचे लागते. 11 फूट उंचीची पार्श्वनाथ भगवान यांची सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे. अशी मूर्ती कुठे भारतभरात नाहीयेत,सर्व मूर्ती या दक्षिणमुखी आहेत. हे क्षेत्र प्रख्यात आहे. या ठिकाणाहून गजपंथ स्वामी उपसर्ग झाले आहेत. मोक्षाला गेले आहेत. तसेच चामराज राजा या ठिकाणी आले असता त्यांना या मूर्तीचं दर्शन झालं आणि त्यानंतर त्यांनी जीर्णोद्धार केला”, असे जैन बांधव सांगतात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: